महात्मा जोतिबा फुले
अनेक समाजसुधारकांनी 19व्या शतकाच्या उत्तरार्धात हिंदू समाजात पसरलेल्या अनिष्ट रूढी आणि परंपराविरूद्ध आवाज उठवायला सुरवात केले. त्यावेळी महिलांवरील अत्याचार, सती, बालविवाह, अस्पृश्यता निर्मूलन आणि जातीव्यवस्था निर्मूलन इत्यादी विविध सामाजिक अनिष्ट प्रथा दूर करण्यात महात्मा जोतीराव फुले यांनी महत्वाचे योगदान दिले.
ते एक समाजसुधारक, विचारवंत व लेखक होते. फुले यांनी 1848 मध्ये पुण्यातील भिडेवाडा येथे पहिली भारतीय मुलींची शाळा सुरू केली. 24 सप्टेंबर 1873 रोजी, त्यांनी आपल्या अनुयायांसह, सर्व जातीतील लोकांना समान हक्क मिळवण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. यात सर्व जाती धर्मातील लोकांनीं एकत्रित येऊन उत्पीडित वर्गाच्या उन्नतीसाठी काम केले.
Jyotirao Phule Mahiti |
◆ सुरुवातीचे जीवन
ज्योतीराव फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कटगुण येथे माळी कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमनाबाई होते. कटगुणहून त्यांचा परिवार पुरंदर तालुक्यातील खानवाडी येथे स्थलांतरित झाले. त्यांचे मूळ आडनाव गोरे असले तरी, त्याच्या कुटुंबाचे वडिलोपार्जित काम बागकाम करणे, फुलांचे हार बनवणे आणि विक्री करणे असल्याने त्यांचे आडनाव पुढे फुले झाले.
जोतीराव केवळ 9 महिन्यांचे असताना त्याची आई मरण पावली. त्यांची मावस आत्या सगुणाबाई यांनी त्यांचे पालनपोषण केले. लहानपणापासून जोतीराव हुशार व चिकित्सक वृत्तीचे होते. जोतीरावांचा विवाह वयाच्या तेराव्या वर्षी सावित्रीबाई यांच्याशी झाला.
◆ शिक्षण: Jyotirao Phule Information in Marathi
त्याकाळात शिक्षणाचे महत्त्वही कमी असल्याने माळी समाज त्याकाळी मागासलेला होता. त्यांचे वडील गोविंदराव यांनी शिक्षण घेण्यासाठी सुरुवातीला विरोध केला परंतु नंतर जोतिरावांना वयाच्या 7 व्या वर्षी प्राथमिक शिक्षणासाठी शाळेत पाठवण्यात आले. हिंदू समाजात असलेल्या जातीभेदामुळे ज्योतिरावांना शाळेतही हा भेदभाव सहन करावा लागला. त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली की त्यानां शाळा सोडून घरीच बसावे लागले. मग सगुणाबाईंनी ज्योतीरावांना घरीच शिकवायला सुरुवात केली. ते दिवसा शेतात काम करत तर रात्रीच्या वेळी घरी अभ्यास करत असत.
ही आवड पाहून त्यांचे शेजारी उर्दू-पर्शियन शिक्षक घाफर बेग आणि ख्रिश्चन पास्टर लेगिट यांनी त्यांच्या वडिलांना पटवून 1842 मध्ये स्थानिक स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये जोतिरावांनी पुन्हा प्रवेश केला. तेथे ते आपला अभ्यास मन लावून करत असत. परीक्षेत त्यांना पहिल्या श्रेणीचे गुण मिळत असत. त्यांनी आपले शिक्षण इंग्रजीत पूर्ण केले.
◆ सामाजिक भेदभावांचा परिणाम
1847 मध्ये त्यांच्या आयुष्यात महत्त्वपूर्ण वळण आले. एका ब्राह्मण मित्राच्या आग्रहामुळे लग्न समारंभात सहभागी झाल्यामुळे ज्योतिरावांना मित्राच्या पालकांनी खालच्या जातीचा म्हणून हिनवले व त्यांचा अपमान केला. या घटनेमुळे जोतीरावांच्या मनावर खोलवर परिणाम झाला.
अगदी लहान वयापासूनच सामाजिक भेदभावाचा सामना करावा लागला. त्यांनी प्रचलित विसंगती उच्च-नीच, जाती-भेद तसेच हिंदू धर्मातील अंध विश्वास हे मानवी विकासाचा अडथळा मानला. त्यांच्या मते धर्म हा मानवांच्या आध्यात्मिक विकासाचे साधन असावे. परंतु तत्कालीन कथित उच्च वर्गाने दलित वर्ग आणि धर्म यांच्यात कृत्रिम भिंत तयार केली होती. त्यांना ही पुराणमतवादी भिंत फोडायची होती.
हा सामाजिक भेदभाव दूर करण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी जोतिरावांनी अनेक पुस्तके वाचून काढली. त्यांना समजले की केवळ शिक्षणच समाजात पसरलेल्या या विसंगतींवर मात करू शकते. म्हणूनच, शिक्षणाचा प्रसार करून त्यांनी समाजात अमूलाग्र बदल घडवून आणण्याचे ठरविले.
◆ स्त्री शिक्षण
ज्योतिराव फुले यांच्या मते जर एक स्त्री शिक्षित झाली तर समाज शिक्षित होईल. कारण मुलांसाठी त्यांची आईच प्राथमिक शाळा आहे. ती संस्कारांची बियाणे मुलांमध्ये पेरते जी आयुष्यभर उपयुक्त ठरते. केवळ तीच समाजाला नवी दिशा दर्शवू शकते. म्हणूनच त्यांनी महिलांच्या शिक्षणावर खूप भर दिला. त्यांनी सावित्रीबाईंना देखील शिक्षित केले.
वंचित आणि महिलांच्या शिक्षणासाठी त्यांनी घरातच मुली आणि मुलांना शिकवायला सुरुवात केली. उच्चवर्गीय लोकांना त्यांचा हा सुधारक प्रयत्न आवडला नाही. तरीही त्यांनी मुलांना शिकवणे चालू ठेवले. हळू हळू त्याचा हा प्रयत्न यशस्वी होऊ लागला. मुलांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. नंतर त्यांनी उघडपणे शिकवणे सुरु केले व शाळेत रुपांतर केले.
1851 मध्ये ज्योतिबाने भारतीय इतिहासातील पहिली मुलीची शाळा सुरू केली. आता या शाळेत शिकवण्यासाठी शिक्षकांची गरज होती. परंतु जे काही शिक्षक त्या शाळेत शिकवायला येत ते उच्चभ्रूंच्या विरोधामुळे आणि सामाजिक दबावामुळे काही दिवसांतच शाळा सोडत. या दुर्दैवी समस्येपासून मुक्त होण्यासाठी ज्योतिबाने त्यांची पत्नी सावत्रीबाई फुले यांना शिकवले. यानंतर सावित्रीबाई फुले भारताच्या पहिल्या प्रशिक्षित महिला शिक्षिका झाल्या.
ज्योतिबा फुले यांच्या या प्रयत्नामुळे सनातनी त्यांच्या विरोधात उभे राहिले. त्यांनी ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा अपमान करण्यास सुरुवात केली. हा विरोध इतका वाढला की त्यांच्या वडिलांनी देखील त्यांना घराबाहेर काढले. पण एवढे त्रास असूनही त्यांनी आपले मनोबल कधीही कमी होऊ दिले नाही. लवकरच त्यांनी एकामागून एक तीन मुलींची शाळा उघडल्या.
◆ इतर सामाजिक सुधारणांसाठी संघर्ष
19व्या शतकात अस्पृश्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय होती. अस्पृश्य वर्गाला पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवले होते. तथाकथित उच्चवर्णीय लोक त्यांना विहिरीतून पाणी भरू देत नसत. ज्यामुळे त्यांना भेटेल ते पाणी पिण्यास भाग पाडले जात असे या करणामुळे ते विविध आजारांनी ग्रासले जात. अशा दयनीय परिस्थिती पाहून ज्योतिबा फुले फार नाराज होते. म्हणून त्यांनी घरात एक विहीर खोदली आणि ती सर्व वर्गांसाठी खुली केली आणि जेव्हा ते नगरपालिकेचे सदस्य झाले तेव्हा त्यांनी सार्वजनिक ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या टाक्या बनवल्या.
ज्योतिबा फुले यांनी सती प्रथेला विरोध दर्शविला आणि विधवांचे लग्न लावून देण्यासाठीची मोहीम राबविली. त्यानुसार त्यांनी आपला मित्र विष्णू शास्त्री पंडित यांचे लग्न विधवा ब्राह्मणशी केले. 1863 मध्ये त्यांनी बालहत्या रोखण्यासाठी बाल हत्या प्रतिबंधक गृह उघडले. 1871 मध्ये पुणे येथे त्यांनी विधवांसाठी आश्रम उघडले.
जसे कार्ल मार्क्स हे युरोपमधील शेतकरी-कामगार चळवळीचे प्रणेते होते. त्याचप्रमाणे ज्योतिबा फुले हे भारतातील शेतकरी कामगार चळवळीचे प्रवर्तक होते. त्यावेळी गिरणी व उच्चवर्गीयांच्या हाताखाली काम करणार्या मजुरांची अवस्था अत्यंत दयनीय होती. त्यांच्या कामाचे तास खूप जास्त होते. या परिस्थितीचा निषेध म्हणून फुले यांनी आवाज उठविला. आपल्या गुलामगिरी या पुस्तकात त्यांनी ख्रिश्चन मिशनरी आणि ब्रिटीश वसाहतवाद्यांचे आभार मानले की त्यांनी सर्व मागास जातींना ते मानवी हक्कांसाठी पात्र आहेत याची जाणीव करून दिली. ते एक यशस्वी व्यावसायिक सुद्धा होते.
◆ सत्यशोधक समाज
24 सप्टेंबर 1973 रोजी फुले यांनी महिला, शूद्र आणि दलित यांच्या हक्कांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. या माध्यमातून त्यांनी मूर्तिपूजेला विरोध केला आणि जातीव्यवस्थेचा निषेध केला. सत्यशोधक समाजाने तर्कशुद्ध विचारसरणीसाठी प्रचार केला. फुले यांनी मानवी कल्याण, आनंद, ऐक्य, समानता आणि सोपी धार्मिक तत्त्वे आणि संस्कार यांच्या आदर्शांसह सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
◆ महात्मा जोतिबा फुले यांचे निधन
1888 साली जनतेने त्यांना महात्मा ही पदवी बहाल केली. त्याच वर्षी त्यांना अर्धांगवायू झाले ज्यामुळे त्यांचे शरीर कमजोर होत गेले. अखेर, 27 नोव्हेंबर 1890 रोजी एक महान व्यक्तिमत्त्व या जगातून कायमचे निघून गेले.
क्रांतिसूर्य जोतीबा फुले यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास आवडला असल्यास नक्की शेअर करा…
✒️ आपल्या भाषेत मराठी भाषेत 🇮🇳