adsense

सिंह माहिती - Lion information in marathi

सिंह - जंगली प्राणी


Sinha Mahiti

                 सिंह हा जंगलाचा राजा म्हणून ओळखला जातो. तो मांसभक्षक प्राणी आहे. सिंहाचे शास्त्रीय नाव 'पँथेरा लिओ' आहे.

जगभरात आशियाई किंवा आफ्रिकन या दोन प्रकारचे सिंह आढळतात. आशियाई सिंहांचे अस्तित्व हे पूर्वापार भारतातच राहिले असून गेल्या काही वर्षांपासून तर ते गीरपुरतेच उरले आहे. आशियाई सिंह एकेकाळी ग्रीसपासून मध्य भारतात बिहारपर्यंत होते. पण शिकारीमुळे ते आता फक्त गीर जंगलात मिळतात. परंतु काही संशोधक लेखकांच्या मते सिंह हा मूळचा भारतातील नसून तो बाहेरून भारतात आणाला गेला व त्यामुळेच त्यांची संख्या इतकी कमी आहे.


वाघांप्रमाणेच सिंहांची शिकार हा स्वातंत्र्यपूर्व काळात राजेमहाराजांचा छंद होता. जुनागडच्या नवाबाने मात्र विसाव्या शतकाच्या प्रारंभी सिंहांच्या शिकारींवर पूर्णत: बंदी घातली. त्याकाळी सिंहांची संख्या तेरावर आली होती, अशी एक आकडेवारी सांगितली जाते. मात्र ही संख्या नेहमीच वादग्रस्त राहिली. काहींच्या मते प्रत्यक्षात ती संख्या शंभराच्या आसपास होती. ते काहीही असले, तरी १९१० पर्यंतच्या काळात हे संकट ओळखले गेले. साहजिकच त्यापुढे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सिंहांनाही अस्तित्व धोक्यात आलेल्या प्रजातींच्या यादीत टाकण्यात आले आणि त्यादृष्टीने काही पावले उचलली गेली. गुजरातेतले गीर हे सिंहांसाठी संरक्षित वनक्षेत्र जाहीर करण्यात आलं. गीरमधील सिंहांना आशियाई सिंहांप्रमाणेच इंडियन लायन असेही संबोधले जाते. आज २०१० साली गीरमध्ये ४११ सिंह आहेत. १९१० ते २०१० या काळात ३९८ सिंह वाढले.

आफ्रिकेतील जंगलात सिंहांची संख्या जास्त आढळते.


◆ आशियाई सिंह पुनर्निवास योजना

                 या योजनेनुसार कुनो पालपूर या जंगलात गीरचे काही सिंह पुनर्निवासित केले जातील. पण गुजरात सरकारचा या योजनेला विरोध आहे. कुनो पालपूर येथे वाघ असल्यामुळे गुजरात सरकारने या योजनेला विरोध केला. वाघ हा प्राणी सिंहापेक्षा तगडा असतो आणि वजनदारपण आसतो. कुनो पालपूरला नेल्यावर तिथले वाघ सिंहाची शिकार करू शकेल. पण सर्वोच्च न्यायालयाने या योजनेला हिरवा कंदील दाखवला आहे. यामुळे गुजरातला काही सिंह आता कुनो पालपूर या अभयारण्यास देणे भाग पडणार आहे. तरीसुद्धा गुजरात सरकारचा दावा आहे की या निर्णयाकडे सर्वोच्च न्यालयाने पुन्हा एकदा नजर द्यावी.सिंह हा जंगलाचा राजा म्हणून ओळखला जातो.

◆ वर्णन       

       १५० ते २५० किलो वजनाचा सिंह हा तसा सामाजिक प्राणी आहे. त्याचे अस्तित्व १०००० वर्षांपासून आशिया आणि आफ्रिकामध्ये आढळते. सिंहाचे दोन प्रकार शिल्लक आहेत आफ्रिकी सिंह आणि आशियाई सिंह. पूर्वी अस्तित्वात असलेले युरोपियन सिंह आणि बारबेरी सिंह हे सिंह आता नामशेष झाले आहेत. पांढरा सिंह हा दक्षिण आफ्रिकेत मिळतो. त्याचे सरासरी आयुष्य १० ते १४ वर्ष असते. ते लहान झुडुपाच्या सवाना जंगलात आढळतात. एकट्याने राहण्यापेक्षा एखाद-दुसर्‍या सवंगड्याबरोबर तो राहतो. चितळ, हरीण, काळवीट, नीलगाय, रानडुक्कर इत्यादी प्राणी हे सिंहांचे खाद्य आहे. सिंहांना अंदाजे चार प्रयत्‍नांनंतर एक शिकार हाती लागते, असे म्हणतात. सिंह दिवसातील वीस तास झोपतात. भारतात धेखिल सिह आढळतात.