adsense

शिव नाडर यांची माहिती : Shiv Nadar Biography in Marathi

शिव नाडर

Shiv nadar
Shiv Nadar information in Marathi


शिव नाडर यांचा जन्म तामिळनाडू राज्यातील तिरुचेंडूर येथे 14 जुलै 1945 रोजी झाला. ते देशातील तिसरे श्रीमंत व्यक्ती व HCL कंपनीचे संस्थापक आहेत.


◆ शिक्षण

पीएसजी कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी कोइंबतूर येथून त्यांनी इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगची डिग्री पूर्ण केली. 1967 साली वालचंद समुहाच्या कूपर इंजिनिअरिंग येथे नोकरी करताना त्यांनी तांत्रिक ज्ञान प्राप्त केले.


◆ HCL ची सुरुवात

शिव यांनी 'मायक्रोकॉर्प' नावाने टेलिडिजिटल कॅलक्युलेटर बिझनेस एका गॅरेज मधून सुरु केला आणि पुढे 1976 साली 1.87 लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून HCL Technologies (हिंदुस्तान कॉम्प्यूटर्स लिमिटेड) या कंपनीची स्थापना केली.


◆ शैक्षणिक सेवांवर भर

शिव नाडर यांनी चेन्नईमध्ये एसएसएन कॉलेज ऑफ इंजिनियरिंग सुरु केले. 2005 मध्ये इंडियन स्कूल ऑफ बिझनेसच्या कार्यकारी मंडळावर त्यांची नियुक्ती करण्यात आली. आयआयटी खरगपूरच्या संचालक मंडळाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहे.


◆ भारतातील श्रीमंत व्यक्तींमध्ये तिसऱ्या स्थानी

शिव नाडर फोर्ब्सच्या सर्वात श्रीमंत भारतीय व्यक्तींच्या यादीत तिसऱ्या स्थानी आहेत. त्यांची एकूण संपत्ती 23.8 अब्ज डॉलर्स एवढी आहे. त्यांची मुलगी रोशनी नाडर-मल्होत्रा सध्या एचसीएलच्या अध्यक्षा असून भारतातील सर्वात श्रीमंत महिलांपैकी एक आहेत.



◆ HCL तिसरी मोठी कंपनी

HCL ही मार्केट कॅपचा विचार करता भारतातील तिसरी मोठी सॉफ्टवेअर कंपनी आहे. कंपनीमध्ये 49 देशांमधील 1.70 लाख कर्मचारी कार्यरत आहेत. HCL कंपनीचे मार्केट कॅपिटल 35.45 अब्ज डॉलर्स इतके आहे. शिव नाडर यांनी आजवर 1 लाख डॉलर्सहून अधिक रक्कम दान केली आहे.


◆ पुरस्कार

आयटीतील योगदान आणि सामाजिक क्षेत्रातील कामगिरीसाठी त्यांना 2008 साली पद्मभूषण देऊन गौरविण्यात आले. मद्रास विद्यापीठाने त्यांना मानद डॉक्टरेट प्रदान केली आहे. नाडर 2007 साली E&Y Entrepreneur of the Year ठरले होते.


स्वप्नं नसतील, तर जीवनात ध्येय नसेल आणि ध्येय नसेल, तर यशस्वी होणं अवघड आहे. त्यामुळे स्वप्नं बघा.