adsense

8 बेस्ट सौंदर्य टिप्स : Best Beauty Tips in Marathi

सौंदर्य टिप्स

Best Beauty Tips in Hindi


टीप 1
तोंडावर सुरकुत्या पडल्या असतील तर आल्याच्या रस कोमट करून तो रात्री झोपताना चेहऱ्यावर लावा आणि सकाळी चेहरा स्वच्छ धुवून वर खोबरेल तेल चोळावे.
या उपायाने सुरकुत्या कमी होऊन त्वचा तेजस्वी होते.

टीप 2
उष्णतेमुळे ओठ, तळहाताची साले निघत असतील तर त्यांना मॉयश्चरायझिंग क्रीम लावून हळूवार मसाज करावा.
सकाळ व संध्याकाळ एक चमचा प्रवाळ मिश्रित गुलकंद खावा.

टीप 3
एक चमचा टोमॅटोचा गर, चिमूटभर हळद.
अर्धा चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा बेसन एकत्र करा.
ही पेस्ट चेहऱ्याला लावा.
अर्ध्या तासाने कापसाने चेहरा पुसून काढा. त्वचा उजळेल.

टीप 4
केसातील कोंडा फार सतावतो. त्यावर उपचारासाठी आवळा, हिरडा, बेहडा, शिकेकाई, संत्र्याचे साल यांचा उपयोग करावा.
यापासून घरच्याघरी औषध तयार करता येईल

टीप 5
आठवड्यातून किमान एकदा उटण्याचा वापर करून मानेची त्वचा स्वच्छ करून घ्यायला हवी.
मान स्वच्छ आणि नितळ ठेवण्यासाठी शक्यतो साबणाचा वापर करू नये.

टीप 6
केस धुतल्यावरही तेलकटपणा कमी न झाल्यास तीन लहान चमचे लिंबाचा रस केस धुऊन झाल्यावर लावा.
आठवड्यातून दोनदा या प्रमाणात हा उपाय केल्यास नक्कीच फायदा होईल.

टीप 7
ओठ फाटून त्यातून रक्त येत असल्यास कोकम तेल आणि शुद्ध तूप यांचा वापर करावा.

टीप 8
उन्हाळ्यात घाम जास्त येतो म्हणून या काळात सुती कपडे वापरावे. सिंथेटिक कपड्यांचा वापर टाळावा.
उन्हापासून त्वचा सांभाळा कडक उन्हामुळे तुमच्या त्वचेचा रंग सावळा झाला असेल तर कच्च्या टोमॅटोला कुस्करून त्यात ताक मिसळून चेहऱ्याला लावल्याने त्वचेला थंडावा मिळतो.
दररोज अंघोळीच्या आधी शरीराच्या उघड्या भागाला दही लावून 10 मिनिटापर्यंत तसेच राहू द्या. मग अंघोळ करा.