adsense

लग्नातील सुंदर उखाणे : Best Ukhane in Marathi

लग्नातील उखाणे :


प्राजक्ताच्या फुलानि भरले अंगण ...... रावांचे नाव घेवुन सोडले कंकण

मानवाने करु नये कुणाचा हेवा,
प्रकाशराव म्हणतात करावी सर्वांची निस्वार्थाने सेवा

जाऊनिया काश्मिरला साजरे केले हनिमुन, ......चे नाव घेते .... ची सुन.

Marathi ukhane
Ukhane In Marathi


वड्यात वडा बटाटावडा,
मारला खडा म्हणून जमला आमचा जोडा.

मंथरेमूळे घडले रामायण, ......
चे नाव घेते आज आहे सत्यनारायण

बंगलौर.म्हैसूर,उटी म्हणशील तिथे जाऊ ... घास घालतो. .... बोट नको चाउस

अत्रावळ पत्रावळ, पत्रावळीवर होती वान्ग्याची फोड ....... हसतात गोड, पण डोळे वटारायची भारीच खोड्

भाजित भाजि पालक, .....माझि मालकिन अन् मि मालक !

आदर्श पती-पत्नी म्हनुन सांगतात नल दमयंती, .....नी घास घ्यावा ही माझी पहिलीच विनंती

लग्नात्त लागतात हार आणी तुरे
....... च्या नाव घेण्याचा आगृह् आता पुरे

सखोल विचार आणि कठीण परीश्रमाला असावी प्रामाणिकपणाची जोड .....चे बोलणे आहे साखरेपेक्षा गोड

फुलासंगे मातीस सुवास लागे, ..... नि माझे जन्मोजन्मिचे  धागे.

रुसलेल्या ज्योतीला पवन म्हणतो हास, ...... ना भरवते मी श्रीखण्ड-पुरीचा घास

पुण्यात औन्ध मधे बन्गला उभा आहे ऐटित जलु नका लोकहो ..... राव आहे आय् टीत

चंदनी पानात मुग्ध कळी हसली .... रावांच्या प्रेमात मी नकळत फसली

साता जन्माच्या जुळल्या गाठी, .... रावांच नाव घेते चालताना सप्तपदि

गुलाबाच्या झाडाला कळ्या येतात दाट  ..... नाव घेते सोडा माझी वाट

नाव घ्या नाव घ्या सगळे झाले गोळा ......च नाव आहे लाख रुपये तोळा

मुर्तीकाराने घडवली सुंदर मुर्ती, विलासरावांची वाढो सर्वदूर किर्ती

रुसलेल्या राधेला कान्हा म्हणतो हास ..... रावांना भरवते ...चा घास

मंगळसुत्राच्या दोन वाट्या, एक माहेरची एक सासरची खूण, .....ची अर्धांगिनी जाहले, भाग्य कुठले याहुन.

पुरनपोलि वरण साजुक तूप भातात .....च्या आवडिचे पदार्थ वाढ़ले चान्दिच्या ताटात

विवाह म्हणजे सुरुवात एका नव-जीवनाची, ......चे नाव घेउन जाणीव ठेवीन स्त्री कर्तव्याची

मनोकामना झाल्या सफल, आकांक्षांची होईल पूर्ती, ..... रावांना मिळो तुमच्या आशीर्वादाने कीर्ती

पुरणपोळीत तुप असावे ताजे अन् साजुक, ..... आहेत आमचे फार नाजुक.

चिमुकल्या ओढ्याची झाली विशाल नदी,..... च्या बरोबर केली सप्तपदी

गोरया गोरया हातावर रेखाटली मी सुबक मेंदी, ..... चे नाव घेण्याची वारंवार येवो संधी

मुंबापुरची मुंबादेवी आज मल पावली श्रीखंडाचा घास देताना ..... मला चावली

अलिकडे अमेरिका पलिकडे अमेरिका नाव घ्यायला सान्गु नका मि आहे कुमारिका

भाव तेथे शब्द, शब्द तेथे कविता .....रांवाच नाव घेते खास तुमच्या करिता.