adsense

संगतीचे फळ : Marathi Nibandha

संगतीचे फळ


marathi nibandha
Marathi Nibandha on Accompaniment Effect


रानातील ते वडाचे झाड जणू पोपटांचेच माहेरघर होते. त्या झाडावरील पानांपेक्षाही पोपटांची घरटीच तेथे जास्त होती. सर्व पक्षी तेथे सुखाने, सलोख्याने राहत होते. त्यांतील एक घरटे होते राधूचे आणि मैनेचे. घरट्यात त्यांची दोन छोटी बाळे होती; तातू आणि सातू. मैना त्यांना सांभाळायला घरी राहत असे. राघू बाहेर जाऊन त्यांना खाण्यासाठी कोवळे कोवळे दाणे घेऊन येत असे. चौघेहीजण खुशीत होते. तातू आणि सातू हळूहळू मोठे होत होते. राघू व मैना त्यांना दुष्ट जगाची माहिती सांगत आणि घरट्याबाहेर न पडण्यासाठी पुन्हा पुन्हा बजावत.

आता तातू आणि सातूला थोडेथोडे उडायला येऊ लागले होते. जवळच्याच झाडावर ते एखादी भरारी घेत. मैनेला हे समजले, तेव्हा ती दोघांना खूप रागे भरली. पुन्हा घरट्याबाहेर पडायचे नाही, असा तिने त्यांना दम भरला.

अवखळ तातू आणि सातू आईचे सांगणे विसरले आणि घरट्याबाहेर पडले. स्वच्छ मोकळ्या आकाशात विहार करण्यात त्यांना मजा वाटू लागली. खूप विहार केल्यावर ते
थकले आणि एका झाडावर जाऊन बसले.

त्या झाडाखाली जमलेल्या लोकांकडे पाहून सातूला तेथे थांबण्यात धोका वाटला. तो तातूला म्हणाला, "चल आपण येथून पुढे जाऊ." पण तातू एवढा थकला होता की त्याने पुढे जाण्यास नकार दिला. त्यामुळे सातू एकटाच पुढे गेला.

झाडाखालील लोकांचे तातूकडे लक्ष गेले. ते दरोडेखोर होते. 'चला, या पाखराला शिजवून खाऊ या.' त्यांच्यापैकी एकाने कल्पना लढवली. पण त्यांच्या टोळीतील एका छोट्याने त्या पोपटासाठी हट्ट धरला. नाइलाजाने सर्वांनी तातूला पिंजऱ्यात अडकवले. पुढे तातू त्याच दरोडेखोरांच्या टोळीत मोठा झाला. त्यांच्याकडून कानांवर पडणाऱ्या अनेक शिव्या आणि अपशब्द तातू शिकला आणि सदासर्वदा तेच बोलू लागला.

सातू उडत उडत पुढे गेला आणि एका झाडावर बसला. त्याने भोवताली अनेक ऋषी, ऋषिकुमार पाहिले. थकलेला सातू तेथील एका झाडावर बसला. सातूने त्या झाडावरचे एक फळ खाल्ले. अतिशय गोड होते ते फळ. सातूचे पोट भरले. मग तो त्याच झाडावर झोपी गेला. सकाळी त्याला जाग आली ती ऋषीमुनींच्या मंत्रस्वराने.

त्याने पाहिले शडाखाली बसलेले अषी व ऋषिकुमार अध्यापन, अध्ययन करत हो ते एक तपोवन असल्याचे सातूच्या लक्षत आले. स्वतूने तेथेच राहणे पसंत केले. य संथा त्यालाही पाठ झाल्या. तोही संस्कृत प्रार्थना म्हणू लागला. तो तेथेच रमला आणि मोठा झालेला सातू तपोवनाचाच तेथील सर्वांना सुखवू लागले. एक अविभाज्य भाग झाला. त्याचे संस्कृत मंत्रवचन बोलणे

इकडे राघू आणि मैना मात्र दुःखी झाले होते. बऱ्याच दिवसांनी ते आपल्या बाळांना शोधण्यासाठी बाहेर पडले. प्रथम त्यांना भेटला पिंजयातील तातू. तातू आईबाबांना ओळखले नाही, उलट त्याने त्यांच्यावर शिव्या आणि अपशब्दांचा मारा केला.

उदास झालेले राघू-मैना पुढे गेले व तपोवनात येऊन पोचले. तेथे त्यांना झाडावर बसलेला सातू दिसला. त्याच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या संस्कृत प्रार्थना ऐकून ते सुखावले. सातूनेही आपल्या आईवडलांचा पाहुणचार केला. तृप्त झाल्यावर ते आपल्या रानाकडे परतले. संगतीचे फळ कसे असते ते त्यांनी अनुभवले होते.

...मराठी निबंध !