adsense

विनायक माळी यांची माहिती : Vinayak Mali Biography in Marathi

विनायक माळी

Vinayak Mali Information in Marathi

सध्या युट्यूबवर आपल्या गावरान (आगरी) भाषेतील व्हिडीओंनी विनायक माळी या तरुणाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. आजकालचे तरुण टिकटॉक, फेसबुक, ट्विटर तसेच इन्स्टाग्रामवर रमत असतानाच विनायक माळी याने याच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. Vinayak Mali Comedy इतक्या उत्कृष्ट पणे सादर करतो की त्याचा व्हिडिओ पाहणार्‍या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य आल्याशिवाय राहत नाही. त्याची प्रसिद्धी इतकी वाढली आहे की, त्याला आगरी किंग व दादुसही म्हटलं जातं. आजच्या लेखात आपण विनायक माळी यांच्या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.


◆ विनायक माळी जन्म

विनायक माळी यांचा जन्म 22 सप्टेंबर 1995 रोजी रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे झाला. तो एका मध्यमवर्गीय आगरी कुटुंबात जन्मला, आई गृहिणी व त्याचे वडील सरकारी कर्मचारी आहेत. वडिलांच्या नोकरीच्या निमित्ताने त्यांना ठाण्याला राहावे लागले. त्याला एक लहान बहीण सुद्धा आहे.


◆ विनायक माळी शिक्षण

त्याचे शालेय शिक्षण ठाण्यातच पूर्ण झाले. ठाणे जिल्ह्यात तो लहानाचा मोठा झाला आणि तेथून त्याने ग्रॅज्युएशन पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विनायक माळीला Wipro कंपनीत नोकरी लागली होती. त्याने काही काळ नोकरी सुद्धा केली. पण वैयक्तिक कारणांमुळे विनायक माळीने ही चांगल्या पगाराची नोकरी सोडून दिली. नोकरी सोडल्यानंतर त्याने एलएलबीची डिग्री घेण्याचा निर्णय घेतला.


◆ विनायक माळी YouTube कारकीर्द

एलएलबी चे शिक्षण घेत असताना पहिल्या वर्षापासून त्याने युट्यूबवर व्हिडिओ अपलोड करण्याचा निर्णय घेतला. विनायक माळी आज इतका प्रसिद्ध असला तरी त्याला ही प्रसिद्धी काही एका रात्रीत मिळालेली नाही. सुरुवातीला तो त्याच्या मोबाईलच्या कॅमेरामधून व्हिडिओ शॉट करायचा आणि स्क्रिप्ट लिहिणे डायरेक्शन करणे हे सर्व तो एकटाच करायचा. यासाठी त्याला अनेक कष्ट घ्यावे लागलेले असून एका कार्यक्रमात बोलताना त्याने याचा उल्लेख केला होता.


विनायक माळी याने सुरुवातीला युट्यूबवर हिंदी भाषेत व्हिडीओ अपलोड करण्यास सुरुवात केली होती. पण त्यात त्याला अपेक्षित यश मिळाले नाही. पण नंतर त्याने आपल्या गावरान भाषेत आपल्या लोकांसाठी व्हिडीओ तयार करण्यास सुरुवात केली. त्यातले बनवलेले आगरी कोळी पोरा व्हिडिओ खूपच वायरल झाली. हळूहळू विनायक माळी हा फेमस होऊ लागला आणि त्याचे काही व्हिडीओ व्हायरल होऊ लागले.


जसे की माझी बायको series, दादुस गेला जिमला असे अनेक व्हिडिओ खूपच व्हायरल होऊ लागले. काही आठवड्यातच या व्हिडिओजना लाखो व्हीव्ज येऊ लागले. या व्हिडिओला मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहून विनायकने माझी बायको Part 2 series तयार केली.


विनायक माळीचे युट्यूबवर सध्या 19 लाख 50 हजार फॉलोअर्स आहेत. युट्यूबकडून विनायक माळीला सिल्व्हर बटणही देण्यात आलं आहे. विनायक माळीच्या व्हिडीओंना युट्यूबवर लाखो व्ह्यूज मिळतात. विनायक माळीची प्रसिद्धी इतकी वाढली आहे की, अनके तरुण-तरुणी त्याच्या आवाजावर व्हिडीओ रेकॉर्ड करुन शेअर करताना दिसतात. विनायक माळीचे टिकटॉकवर 1 लाख 23 हजाराहून जास्त फॉलोअर्स होते. तर इन्स्टाग्रामवर  3 लाखाहून जास्त फॉलोअर्स आहेत.


◆ विनायक माळी यूट्यूबच्या माध्यमातून किती कमावतो? (Vinayak Mali Earning)

विनायक माळी युट्यूब व्हिडीओच्या माध्यमातू महिन्याला जवळपास 75 हजार रुपये कमवतो. ही कमाई कमी जास्त होत असते.


विनायकला अभिनयाबरोबर डान्स आणि गाण्याचीही प्रचंड आवड आहे. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटर तो अनेकदा डान्सचे व्हिडीओ शेअर करताना दिसतो. ऐश्वर्या राय ही त्याची आवडती अभिनेत्री असून अमिताभ बच्चन आवडते अभिनेते आहेत.

विनायक माळीच्या प्रसिद्धीची भुरळ आता मराठी चित्रपटसृष्टीलाही पडली आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी विनायक माळी त्यांनी हवाहवासा वाटतो. नुकतंच 'मन फकिरा' चित्रपटाच्या कलाकारांनी त्याच्यासोबत चित्रपटाचं प्रमोशन केलं. सध्या त्याचा "आरमुट्या" हा गाणं खुपच लोकप्रिय झाला आहे.


विनायक माळी यांची माहिती आवडल्यास आपल्या मित्रांना देखील शेयर करा...


✒️ आपल्या भाषेत मराठी भाषेत 🇮🇳