adsense

मधमाशी विषयी माहिती : Honey Bee Information in Marathi

◆ मधमाशी

Madhmashi
Madhamashi Mahiti Marathi


मधमाशी हा एपिस प्रजातीमधील मध गोळा करणारा एक कीटक आहे. ’हनी बी’ (en:Honey Bee) या नावाने ओळखणाऱ्या गटामध्ये गांधील माशी, आणि कुंभारीण माशा मोडतात. पण मधमाश्या मात्र बारा महिने, समूहाने मेणाचे पोळे बनवून त्यात मध साठवतात. अपिनी जमातीतील एपिस या प्रजातीमध्ये सात जातीच्या मधमाश्या असून एकूण चव्वेचाळीस उपजाती आहेत. बी गटामध्ये वीस हजाराहून कीटक आहेत. यातील काहीं मध साठवतात. पण फक्त एपिस (en:Apis_(genus)) या प्रजातीमधील माश्यांना शास्त्रीय दृष्ट्या मधमाश्या म्हणून ओळखले .


मधमाष्यांचा उगम


(फिलिपाइन्स सहितच्या दक्षिण आणि आग्नेय आशियामध्ये मधमा्श्यांची उत्पत्ती झाली असावी असा अंदाज आहे. एक अपवाद सोडून इतर सर्व मधमाश्यांची उत्पत्ती एकाच मूळ मधमाशीपासून झाली असे [[वर्गीकरण शास्त्र] सांगते. एपिस फ्लोरिया आणि एपिस अँचड्रेनिफॉर्मिस या दोन्ही मधमाश्यांंचा उगम एकच आहे. इओसीन आणि ऑलिगोसीन कालखंडाच्या काठावर युरोपमध्ये मधमाशीचे जीवाश्म सापडले आहेत. तरीही याचा अर्थ युरोपमध्ये मधमाशीचा उगम झाला आहे असा काढता येत नाही. त्या ठिकाणी मधमाश्या होत्या एवढाच अर्थ त्यातून निघतो. या भागातील आणखी काहीं जीवाश्मांचा अभ्यास अजून चालू आहे. एपिस निआर्टिका नावाच्या मधमाशीचा जीवाश्म नेवाडामध्ये सापडलेला आहे. त्याचा काळ एक कोटी चाळीस लाख वर्षापूर्वीचा आहे.


मधमाशीच्या जवळचे इतर कीटक बंबल बी आणि नांगीरहित बी. थोड्या फार प्रमाणात या माष्यासुद्धा समूह वृत्तीने राहतात. समूह वृत्तीने राहणारे सर्वच कीटक एका पूर्वज कीटकाचे वंशज असावेत. एपिस या प्रजातीमधील एक पोळे तयार करणाऱ्या मधमाश्या प्राथमिक जाती असाव्यात. यापासून पुढे खडकांच्या खबदाडीमध्ये अनेक समांतर पोळी तयार करणाऱ्या प्रगत माश्या तयार झाल्या. अशा माश्या पाळणे अधिक सुलभ आहे.


मधमाश्यांपासून मध मिळतो याचे ज्ञान ऐतिहासिक काळापासून आहे. मेण आणि मध ही उत्पादने मिळवण्यासाठी दोन मधमाश्यांच्या जाती माणसाळवल्या गेल्या त्यामध्ये एपिस मॅलिफेरा या इजिप्शियन पिरॅमिड बांधण्याच्या काळापासून माणसाळल्याची नोंद आहे. (इजिप्शियन चित्रामध्ये मधमाश्यांचे पोळे आणि त्यापासून मध मिळविल्याचे दिसते). त्यांच्या मूळ वसतिस्थानापासून दूरवर एपिस मॅलिफेरा नेल्या गेल्या.


मधमाश्यांचे प्रकार


मिक्रॅपिस


एपिस फ्लोरिया आणि एपिस अँ ड्रेनिफॉर्मिस या दोन्ही मधमाश्यांच्या जाती एपिस प्रजातीच्या मिक्रॅपिस या उपप्रजातीमधील आहेत. या मधमाश्या लहान उघडे पोळे झुडुपावर तयार करतात. त्यांची नांगी लहान आकाराची असून माणसाला चावल्यास त्याच्या त्वचेमध्ये फार खोलवर जात नाही. त्यांचे पोळे संरक्षणाची फार काळजी न करता हाताळता येते. या दोन्ही जाती परस्परापासून भिन्न दिसत असल्या तरी त्यांचा उगम एकाच पूर्वज जातीपासून झालेला आहे (sympatrically). मूळ पूर्वज जाति भौगोलिक कारणाने भिन्न झाल्यानंतर त्यांच्या दोन जाती झाल्या असाव्यात (allopatric speciation). त्यानंतर त्यांचा विस्तार झाला. एपिस फ्लोरिया विस्तृत क्षेत्रामध्ये पसरलेली आहे. तर एपिस अँड्रेनिफॉर्मिस अधिक हल्लेखोर आहे. एपिस फ्लोरियापासून अधिक मध मिळवला जातो. एपिस फ्लोरियाची वंशावळ चाळीस लाख वर्षांपासून असल्याचे सिद्ध झाले आहे.


मेगापिस


उपप्रजाती मेगापिस मध्ये फक्त एका जातीची नोंद आहे. उंच झाडावर , कड्यावर, किंवा उंच इमारतीवर एक किंवा अनेक पोळी बांधणारी ही जात अत्यंत आक्रमक आहे. यांच्या पोळ्यामधील मध अधून मधून माणूस काढण्याचा प्रयत्न करतो. उत्तेजित झाल्यानंतर माणसावर केलेल्या हल्ल्याने माणूस अधमाशांच्या दंशाने मृत्युमुखी पडतो.


एपिस डॉर्साटा आकाराने ही मधमाशी सर्वात मोठी आहे. दक्षिण आणि दक्षिणपूर्व आशियामध्ये सर्वत्र पसरलेली आहे.


एपिस डॉर्साटा बिंघॅमी: इंडोनेशियन मधमाशी. एपिस डॉर्साटाची उपजाती किंवा वेगळी जाति असल्याची शक्यता. एपिस डॉर्साटा ब्रेव्हिलिग्युला यास वेगळ्या जातीचा दर्जा आहे.


एपिस डॉर्साटा लॅबोरिओसा : हिमालयातील मधमाशी. काहीं वर्षापूर्वी या मधमाशीला वेगळ्या जातीचा दर्जा मिळाला आहे. या मधमाशीचे वास्तव्य हिमालयातच आहे. एपिस डॉर्साटापासून थोडी भिन्न असून या मधमाशीच्या वर्तनामध्ये विविध स्वरूपाचे परिवर्तन झाले आहे. त्यामुळे अति दुर्गम आणि समुद्रसपाटीपासून उंचावर पोळे बांधू शकतात. ही मधमाशी आकाराने सर्वात मोठी आहे.


एपिस


या प्रजातीमध्ये तीन-चार जाति आहेत. बोर्निओमधील एपिस कोशेव्निकोव्ही ही इतर मधमाशीपासून वेगळी आहे. गुहेमध्ये राहणाऱ्या मूळ मधमाशीपासून हिची उत्पत्ती झाली. एपिस सेराना ही दक्षिण आणि पूर्व आशियामधील मूळ मधमाशी. एपिस मॅलिफेराप्रमाणे लहान आकाराची ही मधमाशी पोळ्यामध्ये सांभाळली जाते. बोर्निओमधील एपिस सेराना न्युलुएन्सिस आणि एपिस निग्रोसिंक्टा या फिलिपाईन्समधील मधमाश्या यांचा नेमका संबंध काय ते अजून समजायचे आहे. नव्या संशोधनानुसार या वेगळ्या जाती आहेत. एपिस सेराना याचा उगम एका जातीपासून झाला नसल्याची शक्यता आहे.


एपिस मॅलिफेरा


एपिस मॅलिफेरा ही मधमाश्यांची जात आता पाळीव झाली आहे. या मधमाशीच्या जनुकीय आराखड्याचा पूर्ण अभ्यास झाला आहे. उष्ण पूर्व आफ्रिकेमध्ये याची उत्पत्ती झाली. उत्तर युरोप आणि पूर्वेकडे आशियामधून ती चीनमध्ये पसरली. या मधमाशीस युरोपियन, पश्चिमेकडील किंवा कॉमन मधमाशी म्हणतात. या मधमाशीच्या अनेक उपजाती आहेत. त्या स्थानिक भौगोलिक हवामानाप्रमाणे बदलल्या आहेत. या माशीपासून बकफास्ट बी नावाची संकरित मधमाशी तयार केलेली आहे. स्थानपरत्वे वर्तन, रंग आणि शरीररचना यामध्ये उपजातींमध्ये बदल आढळतो.


एपिस मधमाशीचा उगम थोडा अनिश्चित असला तरी मायोसीन काळाच्या शेवटी मूळ मधमाशीपासून ही जाति वेगळी झाली असा सिद्धान्त मांडला जातो. गुहेमधील मधमाश्या या पूर्व आफ्रिका आणि पूर्व आशिया या दोन्हीमधील वाळवंटीकरणाचा परिणाम आहे असे समजले जाते. वाळवंटीकरणामुळे वृक्ष नाहीसे झाले, पोळे बांधण्यासाठी आवश्यक झाडे नाहीशी झाल्याने दोन्ही वेगळ्या झालेल्या समूहांमधील जनुक संक्रमण थांबले. शेवटच्या हिमयुगाचा आणि प्रारंभीच्या प्लाइस्टोसीन काळातील हा परिणाम आहे. हजारो वर्षापासून केलेल्या मधमाशी पालनामुळे पश्चिम युरोपियन मधमाशीमध्ये उत्क्रांतीचा वेग वाढला.


अमेरिकेमध्ये एकही मुळची मधमाशी नाही. १६२२मध्ये युरोपियन वसाहतीबरोबर एपिस मेलिया मॅलिफेरा ही गडद रंगाची मधमाशी अमेरिकेत आणली. या पाठोपाठ इटलीमधून एपिस मेलिया लिग्विस्टिका आणि इतर मधमाश्या आणल्या गेल्या. वसाहतीबरोबर मधमाशीवर अवलंबून असलेली पिके लावली गेली. सध्या अमेरिकेत वन्य मधमाश्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मधमाश्या कॉलनीमधील बाहेर पडलेल्या मधमाश्या आहेत. गवताळ मैदानात त्या मोठ्या वेगाने वसाहतींबरोबर पसरल्या. कित्येक वर्षे रॉकी पर्वत ओलांडणे त्याना शक्य झाले नव्हते. १९५०च्या सुमारास मधमाश्या जहाजांतून कॅलिफोर्नियामध्ये दाखल झाल्या.


आफ्रिकन मधमाशी


आफ्रिकन मधमाश्यां किलर बी असे नाव आहे. युरोपियन मधमाश्या आणि आफ्रिकेतील एपिस मेलिफेरा स्कुटेलाटा यांच्या संकरातून या मधमाशीची उत्पत्ती झाली. स्वभावत: या कधीही हल्ला करण्याच्या स्थितीमध्ये असतात. या सहसा रोगाना बळी पडत नाहीत. अपघाताने ब्राझीलमध्ये यांचा उगम झाला. उत्तर अमेरिकेत त्या पसरल्या. त्यांचा उद्रेक एवढा भयंकर होता की काहीं ठिकाणी त्या त्रासदायक ठरल्या. थंडीस त्या फारसा प्रतिकार करू शकत नसल्याने शीत प्रदेशात त्या टिकाव धरू शकल्या नाहीत. त्या उत्तम मध गोळा करतात. त्यामुळे ब्राझीलमधील मधुमक्षिका पालनासाठी त्या उत्तम आहेत.


मधुमक्षिका पालन


एपिस मेलिफेरा आणि एपिस सेरेना इंडिका या दोन मधमाश्या मधुमक्षिका पालन करणार्‍यांमध्ये प्रसिद्ध आहेत. आधुनिक काळातील मधमाश्या या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, जेथे परागीभवन हमखास करण्याची गरज आहे, तेथे घेऊन जाण्यासाठी योग्य आहेत. अश्यामुळे उत्पादन अधिक मिळते. कर्नाटक राज्यामध्ये सूर्यफूल शेतीमध्ये मधमाश्यांच्या पेट्या व्यापारी तत्त्वावर ठरावीक भाडे घेऊन ठेवल्या जातात. शेतीव्यतिरिक्त हा जोड धंदा होऊ शकतो.


धोका


पाश्चिमात्य मधुमक्षिका पालन उद्योगामध्ये एक धोका सध्या उत्पन्न झाला आहे. वरवर पाहता एकाएकी मधमाश्यांची संख्या कमी होते. आणि एक पोळे टिकवून ठेवण्यासाठी जेवढ्या मा्श्यांची आवशकता आहे त्याहून कमी माश्या राहिल्या म्हणजे पोळेच नाहीसे होते. २००७मध्ये तीस ते सत्तर टक्के मधमाश्यांची पोळी नाहीशी झाली. अपुरी प्रथिने, शेती करण्यामधील काहीं बदल किंवा अनिश्चित हवामान अशी याची तीन कारणे सांगितली जातात. उत्तर अमेरिकेत सुद्धा मधमाश्यांची संख्या एवढी कमी आतापर्यंत कधीच झालेली नव्हती. या प्रकारास ‘कॉलनी कोलॅप्स डिसऑर्डर’ असे नाव मिळाले. हा प्रकार नवा आहे की इतर बाह्य घटकामुळे झाला याचा अभ्यास अजून अपूर्ण आहे. पण हे एक लक्षण (सिंड्रोम) असून आजार नाही असे दिसते. जसे इस्रायली अक्यूट परजीवी विषाणूमुळे इस्राईल मध्ये मधमाश्या जवलजवळ संपल्या. २००९मध्ये झालेल्या संशोधनामध्ये मधमाश्यांमधील प्रथिन निर्मितीसाठी एकच जनुक कारणीभूत आहे असे सिद्ध झाले. मधमाश्यांमधील प्रथिननिर्मितीसाठी डिसिट्रिव्हिरिडी जातीचा विषाणू मधमाशीमधील रायबोसोम मधील जनुकीय यंत्रणेवर परिणाम करतो असे दिसले आहे.


मोबाईलचे परिणाम


मोबाईल टॉवर्समधून निघणाऱ्या विद्युतचुंबकीय लहरी हे मधमाश्यांची संख्या कमी होण्यामागील प्रमुख कारण मानले जाते. विद्युतचुंबकीय लहरी मधमाश्यांच्या शरीरात असलेल्या 'चुंबकीय रडार'वर परिणाम करतात. त्यामुळे दिशाहीन झालेल्या माशा गोंधळून जातात व पोळ्यापर्यंत पोहोचत नाहीत.


मधमाशीचे जीवनचक्र


समूहाने राहणाऱ्या कीटकापैकी एक मधमाशी. अशा प्राण्यांना eusocial असे म्हणण्याची पद्धत आहे. सुझान बात्रा यानी ही संज्ञा दिली..[१]. याचा मराठीमध्ये “ समूह सहजीवन वृत्ती” असे म्हणता येईल. समूहाने पिढ्यान्‌पिढ्या राहताना या गटाएवढे सामूहिक वर्तन जनुकीय पातळीपर्यंत पोहोचले आहे. एका वसाहतीमध्ये एक राणी माशी, ऋतुमानाप्रमाणे थोडे नर आणि सतत बदलता राहणारा कामकरी माश्यांचा समूह अशी पोळ्याची रचना असते. जातीप्रमाणे पोळ्याच्या राणी, नर, आणि कामकरी माश्यांची संख्या बदलते. पण या श्रेणीमध्ये सहसा बदल होत नाही. सामान्यपणे सर्व पोळ्यामधील समान गोष्टी खालीलप्रमाणे-


१. कामकरी माश्या राणीमाशीनेने घातलेली अंडी मेणाने बनवलेल्या कोठड्यामध्ये ठेवतात. कोठड्या बनविण्याचे काम कामकरी माश्यांचे असते. एका कोठडीत एकच अंडे ठेवले जाते. राणी माशी शुक्रगाहिकेमधील [[शुक्रजंतू]पासून अंडे फलित करू शकते. कामकरी माश्या आणि राणी माशी फलित अंड्यांपासून तर नर अफलित अंड्यांमधून निपजतात. नर एकगुणित गुणसूत्राचे, तर राणी आणि कामकरी माशा द्विगुणित गुणसूत्रांच्या असतात. अंड्यातून बाहेर पड्लेल्या अळ्याना कामकरी माश्या प्रारंभी रॉयल जेली खायला घालतात. नंतरच्या काळात अंळ्याना फक्त मध आणि परागकण खायला घातले जातात. ज्या अळीला फक्त रॉयल जेलीच्या खाद्यावर ठेवलेले असते त्यापासून राणी माशी तयार होते. अनेक वेळा कात टाकल्यानंतर अळी स्वत:भोवती कोश तयार करते.


२. कामकरी माश्यांच्या कार्याच्या विभागणीचा विस्तृत अभ्यास झालेला आहे. नव्या कामकरी माश्या पोळे स्वच्छ ठेवण्याचे आणि अंड्यांतून बाहेर आलेल्या अळ्याना खायला घालण्याचे काम करतात. नव्या कामकरी माश्यांच्या शरीरात असलेल्या ग्रंथीनी रॉयल जेली बनविण्याचे काम थांबविल्यानंतर त्या पोळ्यामधील नव्या कोठड्या बांधण्यास मेण तयार करतात. कामकरी माश्यांचे वय जसे अधिक होईल तसे त्यांचे काम बदलत जाते. मेण बनविण्याचे काम जमेनासे झाल्यावर त्या मध गोळा करणे आणि परागकण आणणे, पोळ्याचे रक्षण करणे अशी कामे करतात. आयुष्याच्या शेवटपर्यंत त्या मध आणि पराग गोळा करण्याच्या कामाव्यतिरिक्त काहीं काम करीत नाहीत.


३. कामकरी माश्या अन्न गोळा करतात. ठरावीक प्रकारच्या “वॅगल डान्स”च्या सहाय्याने त्या परस्पराना अन्न आणि पाणी कोठल्या दिशेला आणि किती लांब आहे हे सांगतात. अन्न पोळ्याच्या जवळ असेल तर वर्तुळाकार डान्स आणि लांबवर असेल तर वॅगल डान्स अशी त्यांची संदेशवहनाची पद्धत आहे. मधमाश्यांच्या “डान्स लँग्वेज” च्या अभ्यासास कार्ल व्हॉन फ्रिश्च या ऑस्ट्रियामधील संशोधकास १९७३ साली फिजिऑलॉजी आणि मेडिसीनमधील नोबेल पुरस्कार देण्यात आला. एपिस मेलिफेरा या मधमाशीवर त्यानी हा अभ्यास केला होता.


४. अन्न गोळा करून आणलेल्या माष्यांकडून ते पोळ्यात नेण्यासाठी नव्याने कामाला लागलेल्या माश्यांसाठी वेगळ्या पद्धतीचे “थरथराट नृत्य”, ट्रेम्बल डान्स केला जातो.


५. नवी राणी मधमाशी पोळ्यापासून दूरवर उड्डाण करून अनेक नर माशांशी मैथुन करून आपल्या शुक्रकोशिकेमध्ये शुक्रजंतू साठवून ठेवते. मिथुनानंतर नर माशीचा मृत्यू होतो. साठवलेल्या शुक्रजंतूपासून फलित अंडे घालायचे की अफलित हे राणी माशी नेमके कसे ठरविते हे नीटसे समजले नाही.


६. मधमाश्या या बाराही महिने समूहाने मेणाचे पोळे बनवून त्यात मध साठवतात. मधाचे पोळे हा राणीमाशी, अनेक कामकरी माष्या आणि थोडे नर यांचा एकत्रित समूह म्हणून अस्तित्वात असतो. एकदा नव्या राणी माशीचे फलन झाले म्हणजे पोळ्यातील कामकरी माश्या आणि राणीमाशी नवे पोळे बांधायला बाहेर पडतात. नव्या पोळ्याची जागा कामकरी माशानी आधीच शोधून ठेवलेली असते. नव्या जागेवर आल्या आल्या त्या नव्या पोळ्यासाठी मेणाच्या कोठड्या बांधायला घेतात. त्याच वेळी नव्या कामकरी माश्यांचे उत्पादन चालू होते. सामूहिक कीटक सृष्टीमध्ये असे वर्तन इतर जातीमध्ये आढळत नाही.


मधमाश्यांमधील एका वेगळ्या प्रकाराच्या नांगी नसलेल्या माश्या राणी माशी येण्याआधीच पोळे बांधून तयार ठेवतात.


थंडीपासून बचाव


दहा सेल्सियसपेक्षा कमी तापमानास मधमाश्या उडणे थांबवतात आणि पोळ्याच्या मध्यवर्ती भागावर गोळा होतात. थंडीमध्ये एकत्र येण्याच्या या प्रकारामुळे आणि टप्प्याटप्प्याने केलेल्या हालचालीमुळे राणी माशीभोवतीचे तापमान २७ सेंटिग्रेडपर्यंत ठेवले जाते. या तापमानास राणी माशी अंडी घालू शकत नाही. पोळ्याचे तापमान 34 अंशापर्यंत वाढल्यानंतर राणी आणखी एकदा अंडी घालण्यास प्रारंभ करते. कामकरी माशा सतत पोळ्याच्या आतील भागाकडून बाहेरील भागाकडे फिरत राहिल्याने कोणत्याही माशीस असह्यथंडीस तोंड द्यावे लागत नाही. मधमाश्या गोळा झालेल्या समूहाच्या बाह्य कडेचे तापमान ८-९ सेंटिग्रेड असते. बाहेरील तापमान जेवढे थंड तेवढे एकत्र आलेल्या माश्यांचे थर वाढत जातात. थंडीच्या दिवसात माशा साठवून ठेवलेला मध शरीराचे तापमान टिकवून ठेवण्यासाठी वापरतात. सतत खर्च केलेल्या मधामुळे पोळ्याचे वजन कमी होत जाते. थंडीच्या तीव्रतेनुसार तीस ते सत्तर टक्के मध खर्च केला जातो.


परागीभवन


एपिस कुलातील माश्या विविध फुलातील मध गोळा करतात. त्याचबरोबर अनेक फुलांचे परागीभवन मधमाश्यांमुळे होते. एपिस मेलिफेरा परागीभवनासाठी उपयुक्त ठरली आहे. व्यावसायिक पद्धतीने एपिस मेलिफेराच्या वसाहती पिकामध्ये फुले येण्याच्या काळात ठेवल्यास उत्पन्नामध्ये तीस टक्केवाढ दिसली आहे. अब्जावधी डॉलरचे कार्य मधमाश्या मोफत करीत असतात.


मध


मध हे फुलामधील मधुरसावर शरीरातील विकरांची प्रक्रिया होऊन पोळ्यातील कोठड्यामध्ये साठवून ठेवलेला अन्न साठा आहे. माणूस एपिस प्रजातीच्या सर्व मधमाश्यांच्या पोळ्यातील मधाचा वापर अनेक वर्षे करीत आलेला आहे. एपिस मेलिफेरा आणि एपिस सेरेना या मधमाश्यांच्या पोळ्यातील मधाचे व्यापारी उत्पादन घेतले जाते.


मेण: ठरावीक वयाच्या कामकरी माश्यांच्या पोटावरील खंडामधून मेण तयार होते. या मेणाचा पोळ्यामध्ये नव्या कोठड्या तयार करणे, ज्या कोठड्यामध्ये अंडी साठवून ठेवली आहेत त्यांची तोंडे बंद करणे आणि पोळ्याची दुरुस्ती करणे यासाठी होतो. मेणापासून सौंदर्यप्रसाधने बनविली जातात.


पराग


कामकरी मधमाशीच्या पायावर असलेल्या पराग पिशवीमध्ये परागकण साठवून पोळ्यामध्ये आणले जातात. अंड्यांमधून बाहेर पडलेल्या अळ्यांना प्रथिनांचा स्रोत म्हणून पराग खायला दिले जातात. एपिस मेलिफेरा आणि एपिस सेरेना यांच्या पोळ्यामधील पराग गोळा करून त्यांचा वापर अन्नाबरोबर केला जातो.


प्रोपोलिस


पोळे बांधणाऱ्या मधश्याशा झाडाच्या ढोलीमध्ये झाडाच्या रेझिनपासून प्रोपोलिस नावाचा एक चिकट द्रव बनवतात. याच्या सहाय्याने पोळे झाडाला चिकटवले जाते. पोळ्याला पडलेल्या भेगा बुजवण्यासाठी प्रोपोलिस वापरले जाते. ज्या झाडावर मुंग्या आहेत त्यांचा उपद्रव पोळ्यास होऊ नये यासाठी पोळ्याजवळ येण्याच्या मार्गात प्रोपोलिस पसरून ठेवले म्हणजे मुंग्या या चिकट द्रवावर अडकून पोळ्यापर्यंत येत नाहीत. प्रोपोलिसपासून काहीं सौंदर्यप्रसाधने बनविली जातात.


संरक्षण


समूहाने राहणाऱ्या सर्व कामकरी मधमाश्या पोळ्यास उपद्रव देणार्‍याला दंश करून पोळ्याचे रक्षण करतात. हल्ला करताना पोळ्यातील सर्व कामकरी माश्यांना फेरॅमोन जातीच्या गंध द्रव्याच्या सहाय्याने सूचना दिली जाते. त्यामुळे एकाच वेळी सर्व कामकरी माश्या उपद्रव करणार्‍यावर हल्ला करतात. कामकरी माशीच्या पोटाच्या शेवटी असलेल्या दोन वक्र काट्यांच्या स्वरूपात असलेला अवयव म्हणजे मधमाशीची नांगी. नांगीच्या तळाशी असलेल्या विषग्रंथीभोवती स्नायू असतात. हल्लेखोराच्या शरीरात नांगी घुसवताना विषग्रंथीमधून विष बाहेर येते. पण दंश केल्यानंतर नांगी हल्लेखोराच्या शरीरातच राहते. नांगी शरीराच्या बाहेर पडल्यामुळे नंतर कामकरी माशीचा मृत्यू होतो.


मधमाशीची नांगी आणि त्यावरील वक्र काटे पृष्ठवंशी प्राण्यांचापासून मधाचे आणि स्वत:चे संरक्षण करण्यासाठी उत्क्रांत झाले असावे असे वाटते. कारण नांगीस असलेल्या काट्यामुळे त्वचेमध्ये अडकलेली नांगी उपटून बाहेर निघते. राणी मधमाशीच्या परस्परावरील हल्ल्याच्या वेळी राणी माशीची नांगी हत्यारासारखे काम करते. एपिस सेरेना मधमाशीचा इतर कीटकांचा प्रतिकार करण्याची पद्धत वेगळी आहे. आपल्या पोळ्यावर दुसऱ्या कीटक आल्याचे दिसताच सर्व कामकरी माशा आगांतुक कीटकाच्या अंगावर धावून जातात. कामकरी माशांचे स्नायू जोराने थरथरतात. अशा थरथराटामुळे आगांतुक कीटकाभोवतीचे तापमान एवढे वाढते की आगांतुक कीटकाचे मरण ओढवते. याआधी फक्त वाढलेल्या तापमानामुळे आगांतुक कीटक मृत्यू पावतो असे वाटत होते. नव्या संशोधनानुसार आगांतुक कीटकाभोवती तापमानाबरोबर कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमालीचे वाढल्याचे आढळून आले आहे. वाढलेल्या तापमानामुळे आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कीटक मरण पावतो. पोळ्यामध्ये आलेली नवखी राणी किंवा निकामी झालेल्या राणीचा याच पद्धतीने निकाल लावला जातो. या प्रकारास मधमाश्या पाळणारे बॉलिंग द क्वीन असे म्हणतात.


मधमाशीमधील संप्रेषण


विविध रासायनिक पदार्थ आणि गंधावर मधमाशीचे संप्रेषण अवलंबून आहे. राणी माशीच्या शरीरातून बाहेर सोडल्या जाणाऱ्या गंधामुळे कामकरी माश्या आपले पोळे शोधून काढतात. एका पोळ्यातील मधमाश्या दुसऱ्या पोळ्यात गेल्यास त्यांची हत्या होते. राणी माशीचे आपल्या पोळ्यातील सर्व माश्यांवर पूर्ण नियंत्रण असते.