adsense

कुत्र्याची माहिती : Dog Information in Marathi

 कुत्रा

Dog Information in Marathi

Domain: युकारियोटा


वंश: कणाधारी


जात: सस्तन


वर्ग: मांसभक्षक


कुळ: कॅनिडे


जातकुळी: कॅनिस


जीव: कॅ. लुपस


उपजीव: कॅ. लु. फॅमिलियरीज


कुत्रा किंवा श्वान (Dog) हा एक भूचर सस्तन प्राणी आहे. याचे शास्त्रीय नाव कॅनिस लुपस फॅमिलियारिस असे आहे.


कुत्रा हा इमानदार प्राणी असल्याने त्याचा वापर राखण करण्यासाठी, शिकार करण्यासाठी, गुन्ह्यांच्या तपासाठी तसेच सोबतीसाठी करतात. अनेक व्याधींमध्ये कुत्र्याचा उपयोग ‘थेरपी डॉग’ म्हणून केला जातो. कारण कुत्रा मानसिक तणाव कमी करण्यास मदत करतो. रक्तदाबाचा त्रास, हृदयरोग आदींनी ग्रस्त मंडळींना कसे हाताळायचे, याकरिता आता अभ्यासक्रम तयार करण्यात आले आहेत. अशा प्रशिक्षित कुत्र्यांना ‘थेरपी डॉग्ज’ म्हणतात.


रंग, उंची, ठेवण व त्यांचे उपयोग यावरून जगात कुत्र्याच्या जवळजवळ ४०० जाती पहावयास मिळतात या विविध जातीच्या कुत्र्यांचे वजन ६०० ग्रॅम पासुन अगदी १०० किलोपर्यंतही असते, तर उंची ८ इंचांपासून ४ फुटांपर्यंत असते.


उत्पत्ती


कुत्र्याची उत्पत्ती ही बहुधा लांडग्यापासून झाली असावी, असे मानण्यात येते. लांडग्याचे आकारमान आणि दातांची ठेवण ही कुत्राशी मिळती-जुळती आहे.


इतिहास


कुत्रा हा पुरातनकाळापासून मनुष्याच्या सानिध्यात राहिला. अन्नासाठी कुत्रा हा माणसाच्या सानिध्यात राहिला असावा.


वैदिक वाङमयात कुत्र्याचे उल्लेख आढळतात. महाभारतातील राजा युधिष्ठिर हा स्वर्गात जाताना त्याच्याबरोबर एक कुत्रा होता. यावरून कुत्र्याचा इमानीपणा सांगितला आहे. इंद्राची सरमा नावाची कुत्री प्रख्यात होती. वेदकाळात कुत्रा हा काही कारणाने अपवित्र मनाला गेला. पण श्री दत्तगुरूंच्या सानिध्यात कुत्र्याला स्थान देण्यात आले. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघ्या कुत्र्याची समाधी आहे.


कुत्र्यांच्या भारतीय जाती


इंडियन परिहा किंवा इन डॉग


साधारणपणे भारतभरात सगळीकडे या प्रजातींचे कुत्रे दिसतात. आपल्याकडे दिसणार्‍या भटक्या कुत्र्यांप्रमाणेच साधारणपणे यांचे रंग-रूप असते. मात्र तरीही ही प्रजाती पूर्णपणे वेगळी आहे. हे श्वान घोडारंगाचे किंवा काळ्या रंगाचे असतात. काटकपणा हे या प्रजातीचे वैशिष्ट्य मानले जाते.


इंडियन माऊंटन डॉग


हा हिमालयाच्या परिसरात आढळणारा कुत्रा आहे. हा तेथील हवामानाच्या गरजेनुसार केसाळ आणि ताकदवान असतो. हिमाचल प्रदेश, काश्मीर, उत्तराखंड या भागांत संरक्षणासाठी हा श्वान पाळला जातो. ‘गड्डी कुत्ता’ असे याचे स्थानिक नाव आहे.


कन्नी


कुत्र्याच्या या जातीचे मूळ स्थान मूळ स्थान तामिळनाडू असून, मालकाशी अत्यंत इमानदार राहणारी आणि पाळीव म्हणून घरात पटकन मिसळून जाणारी प्रजाती म्हणून या श्वानांची ओळख आहे. ही कुत्री साधारणपणे काळ्या रंगात आढळतात.


कुमाऊँ माऊंटन डॉग


कोंबई


ही दक्षिण भारतात आढळणारी प्रजाती आहे. ह्या जातीचा कुत्रा शेताच्या राखणीसाठी पाळला जातो. उंचीला कमी, पण ताकदवान अशी ही प्रजाती आहे.


चिप्पीपराई


कुत्र्याची ही जातही दक्षिण भारतात आढळते.


पांडीकोना


ही जात मध्य भारतात आढळते.


बखरवाल डॉग


मुधोळ हाऊंड, कारवान हाऊंड किंवा पश्मी


महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश येथे प्राधान्याने आढळणारी ही प्रजाती आहे. शिकारीसाठी किंवा राखणीसाठी हा श्वान पूर्वी पाळला जायचा. ह्या कुत्र्यांचा रंग पांढरा, काळा किंवा करडा असतो. ह्या जातींच्या कुत्र्यांची उंची जास्त असते. हे श्वान स्वभावाने आक्रमक असतात.


राजपलयम


ही दक्षिण भारतातील प्रजाती आहे. शुभ्र पांढरा रंग, गुलाबी नाक, उंच, लांब पाय आणि चणीने थोडे बारीक असे हे श्वान राजघराण्यांमध्ये पूर्वी पाळले जायचे. अस्वलांच्या शिकारीसाठी या श्वानांचा उपयोग पूर्वी केला जात असल्याचे उल्लेख आढळतात.


कुत्र्यांच्या भारतीय प्रजातींचे वैशिष्ट्य


भारताच्या भौगोलिक विविधतेनुसार तेथील हवामान, खाणे, जीवनशैली स्वीकारून प्रजाती देशभरातील विविध भागांत पसरल्या आहेत. त्यामुळे कुत्र्याच्या भारतीय प्रजातींची प्रतिकारशक्ती अधिक असते. त्यांच्या गरजाही तुलनेने कमी असतात. स्थानिक परिस्थितीशी नाळ जुळलेली असल्यामुळे तेथील होणारे बदलही या प्रजाती तुलनेने लवकर स्वीकारतात. स्थानिक गरजांनुसार त्यांची गुणवैशिष्ट्ये निर्माण झालेली असल्याने देशाच्या सीमा सुरक्षा दलांकडून राजपलयम किंवा हिमालयाच्या परिसरातील स्थानिक श्वान प्रजातींचा अधिक वापर केला जातो.