adsense

आचार्य चाणक्य यांचे जीवन : Acharya Chanakya Biography in Marathi

 आचार्य चाणक्य

आचार्य चाणक्य
Acharya Chanakya Mahiti

भारताच्या इतिहास एक महान विद्वान म्हणून आचार्य चाणक्य हे  विष्णुगुप्त आणि कौटिल्य यासारख्या नावाने देखील प्रसिद्ध आहेत. एक महान तत्वज्ञानी असण्याबरोबर ते अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी देखील होते. त्यांनी 'द अर्थशास्त्र' हा भारतीय राजकीय ग्रंथ लिहिला. या पुस्तकात, संपत्ती, अर्थशास्त्र आणि भौतिक यशाच्या संदर्भात त्या काळाची जवळजवळ प्रत्येक गोष्ट लिहिली होती. राजनीतिक विज्ञान आणि अर्थशास्त्र या सारख्या क्षेत्रांचा केलेला विकास आणि त्यासाठी दिलेलं आपलं महत्वपूर्ण योगदान याकरता आचार्य चाणक्य यांना आजसुद्धा या क्षेत्रातील विद्वान आणि आग्रणी मानलं जाते.


आचार्य चाणक्य यांचे महान विचार जर आपण अंगिकारले तर नक्कीच आपण आयुष्यात यशस्वी होऊ शकतो. आचार्य चाणक्य यांनी आपल्या बुद्धिमत्तेने आणि तीक्ष्ण विचारांनी कुटनीती आणि राजकारणाचे अगदी सरळ साधे स्पष्टीकरण दिले आहे. भारतवर्षामध्ये आचर्य चाणक्य यांना एक थोर समाजसेवक आणि अभ्यासक मानलं जाते. चाणक्य यांच्या राजकीय धोरणांमुळे बरीच मोठी राज्येही स्थापन झाली होती. या लेखात आपण चाणक्य यांच्या जीवनाबद्दल आणि महानतेबद्दल तसेच त्यांच्या जीवनातील संघर्षांबद्दल जाणून घेऊया.


◆ सुरुवाचीचे जीवन: Acharya Chanakya Information in Marathi


“नशिब सुद्धा अशाच लोकांना साथ देतो जे कठीण परिस्थितीतही त्यांच्या ध्येयांवर ठाम असतात”

अशा महान विचारांचे प्रणेते चाणक्य यांच्या जन्मा बद्दल स्पष्ट उल्लेख आढळत नाही, परंतु बौद्ध धर्मानुसार त्यांचा जन्म  350 ईसापूर्व तक्षशिलाच्या कुटिल नावाच्या ब्राह्मण घराण्यात झाला. आचार्य चाणक्यच्या जन्माबद्दल वेगवेगळे मतभेद आहेत. काही विद्वानांच्या मते ते कुटिल वंशात जन्मल्यामुळे कौटिल्य म्हणून ओळखले जात असे. तर काही विद्वानांच्या मते, त्यांच्या उग्र आणि गूढ स्वभावामुळे ते 'कौटिल्य' म्हणून ओळखले जाऊ लागले .


तसेच काही विद्वानांच्या विचारानुसार या थोर आणि बुद्धिमान अर्थशास्त्रज्ञांचा जन्म नेपाळच्या “तराई” मध्ये झाला होता. तर जैन धर्मानुसार त्याचं जन्मस्थळ “मैसूर” (बंगळूर) मधील श्रावणबेलगोला मानल जाते. याचं प्रमाणे त्यांच्या जन्म ठिकाणा बद्दल “मुद्राराक्षस” ग्रंथाची रचना करणारे विशाखा दत्त यांच्या मतानुसार त्यांच्या वडिलांना चमक म्हटलं जात असे. याच कारणामुळे त्यांच्या वडिलांच्या नावाच्या आधारे त्यांना चाणक्य म्हटलं जाऊ लागलं.


चाणक्यचा जन्म एका अत्यंत गरीब कुटुंबात झाला. त्यांनी बालपणात खूप दारिद्र्य पाहिले, दारिद्र्यामुळे चाणक्याला कधीकधी उपाशीही झोपावे लागले. आचार्य चाणक्य लहानपणापासूनच खूप रागीट आणि हट्टी स्वभावाचे व्यक्ती होते. त्यांच्या उग्रवादी स्वभावाच्या वृत्तीमुळे त्यांनी नंद अंशाचा विनाश करण्याचा कठोर निर्णय घेतला. आचार्य चाणक्य यांना सुरवातीपासूनच साधे राहणीमान पसंद होते. काही इतिहासकारांच्या मते आचार्य चाणक्य महामंत्री सारख्या मोठ्या पदावर असताना देखील त्यांनी कधीच आपल्या पदाचा गैर वापर केला नाही. त्यांना धन आणि यशाचा कधीच लोभ नव्हता. चाणक्य (कौटिल्य) यांनी आपल्या जीवनात अनेक चढ-उतार पहिले होते. शिवाय त्यांनी जीवनात केलेला संघर्ष आणि त्यांचे उच्च विचारांमुळे ते एक महान विद्वान बनले.


◆ आचार्य चाणक्य यांचे शिक्षण: Acharya Chanakya Mahiti


आचार्य चाणक्य यांचे शिक्षण प्रसिद्ध नालंदा विद्यापीठात झाले. ते लहानपणापासूनच एक प्रतिभावान विद्यार्थी होते, त्यांना वाचनाची आवड होती. काही ग्रंथांनुसार चाणक्य यांनी तक्षशिलेत शिक्षण घेतले. नालंदा व तक्षशिला हे बौद्ध विश्वविद्यालय होते. येथे जगभरातून अनेक विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असत.

प्राचीन काळात तक्षशीला हे उत्तर-पश्चिम प्राचीन भारतातील शिक्षणाचे प्राचीन केंद्र होते. ब्राह्मण कुटुंबात जन्मणारे आचार्य चाणक्य यांना अर्थशास्त्र, राजकारण, युद्धाची रणनीती, औषध आणि ज्योतिषी या सारख्या विषयांण बद्दल खूप खोलवर आणि चांगले ज्ञान होते. ते या सर्व विषयांत विद्वान होते.

काही विद्वानांच्या मते आचार्य चाणक्य यांना ग्रीक आणि फारसी भाषेचं ज्ञान होतं. याव्यतिरिक्त वेद आणि साहित्य त्यांना चांगल्याप्रकारे अवगत होते. आपलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी तक्षशीला  विश्वविद्यालयामध्ये राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र विषयांचे प्राध्यापक म्हणून काम केलं.


या घटनांनमुळे बदलले आचार्य चाणक्य यांचे जीवन :


अर्थशास्त्रा सारख्या कठीण विषयाची रचना करणारे महान अर्थतज्ञ आचार्य चाणक्य एक कुशल आणि महान चारीत्रवान व्यक्ती होते. त्यांनी आपल्या आयुष्यात एक महान शिक्षक रुपात ज्ञान देण्याचं काम केलं आहे.

त्यांच्या थोर विचार आणि महान धोरणांमुळे ते खूप प्रसिद्ध झाले होते. त्यांच्या जीवनात इतका सुंदर काळ सुरु असतांना अचानकपणे त्यांच्या जीवनात अश्या काही दोन घटना घडल्या ज्यामुळे त्यांचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं.


पहिली घटना – भारतावरील सिकंदर यांचे आक्रमण आणि तत्कालीन लहान राज्यांची हार.

दुसरी घटना – मगध च्या शासका द्वारे कौटिल्य यांचा करण्यात आलेला अपमान.


अचानकपणे घडलेल्या या घटनांमुळे कौटिल्य यांनी देशाची एकता आणि अखंडतेचे रक्षण करण्याचा संकल्प केला. आपला संकल्प साध्य करण्यासाठी त्यांनी देशातील राज्यकर्ते शासक यांना शिक्षित करणे योग्य समजले. तसेच, शासकांना राजकीय धोरणे शिकविण्याचा दृढ निश्चय केला.


संपूर्ण पृथ्वीवर राज्य करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या महान सम्राट सिकंदर (अलेक्झांडर) भारतावर आक्रमण करण्याच्या हेतुने आला होता. आचार्य चाणक्य यांनी भारताताच्या संस्कृतीचे रक्षण करण्याकरता देशातील सर्व राजांना आग्रह केला परंतु, त्यावेळी सम्राट सिकंदर यांच्या सोबत युद्ध करण्यास कोणीही तयार नव्हते.


सिकंदरची सेना खूपच विशाल होती. शिवाय, ते स्वत: देखील खूप शूरवीर योद्धा होते. त्यानंतर पुरुने अलेक्झांडरशी युद्ध केले पण त्याचा पराभव झाला. त्याकाळात मगध हे एक चांगले शक्तिशाली राज्य होते. त्या राज्याच्या शेजारील सर्वच राज्यांची नजर मगध राज्यावर होती. सिकंदर यांच्या रूपाने देशावर ओढून आलेल्या संकटाचे रक्षण करण्याकरता आचार्य चाणक्य, तत्कालीन मगध चे शासक धनानंद यांच्याकडे मदत मागण्यासाठी गेले.


परंतु, आपल्या भोग विलास आणि शक्तीच्या धुंदीत मग्न असणारे धनानंद यांनी चाणक्य यांचा प्रस्ताव परतावून लावला आणि त्यांना उद्देशून म्हटलं की,

“तुम्ही पंडित आहात त्यामुळे आपल्या शेंडीची काळजी करा; युद्ध करणे हे राजा चे काम आहे तुम्ही पंडित आहात त्यामुळे तुम्ही फक्त पंडिताचे काम करा”

हे ऐकल्यानंतर चाणक्य यांनी नंद साम्राज्याचा विनाश करण्याची प्रतिज्ञा घेतली.


◆ चाणक्य आणि चंद्रगुप्त:


आचार्य चाणक्य आणि चंद्रगुप्त यांचे घनिष्ट संबंध होते. चाणक्य हे चंद्रगुप्त यांच्या साम्राज्याचे महामंत्री होते. त्यांनीच चंद्रगुप्त यांना साम्राज्य स्थापण करण्यास मदत केली होती.

मगध राज्याचे शासक धनानंद यांनी आचार्य चाणक्य यांचा अपमान केला होता. आपल्या अपमानाचा बदला घेण्याकरता त्यांनी नंद घराण्याचे साम्राज्य नष्ट करण्याचा संकल्प केला. आपला संकल्प तडीस नेण्याकरता चाणक्य यांनी धाडसी आणि शूर योध्याच्या शोध घेण्यास सुरुवात केली.

आचार्य चाणक्य यांनी सर्वप्रथम चंद्रगुप्त यांना आपले शिष्य बनविले. चंद्रगुप्त यांच्या प्रती असणाऱ्या प्रतिभेला चाणक्य यांनी आधीच ओळखून घेतलं होतं. आपला संकल्प पूर्ण करण्याकरता त्यांनी चंद्रगुप्त यांची निवड केली होती.


चाणक्य चंद्रगुप्त मौर्यला भेटला तेव्हा चंद्रगुप्त अवघ्या 9 वर्षांचे होते. यानंतर चाणक्य यांनी आपल्या अनोख्या ज्ञानाने चंद्रगुप्त यांना व्यावहारिक व तांत्रिक कला शिकविल्या.

आचार्य चाणक्य व चंद्रगुप्त यांनी नंद साम्राज्याचा विनाश करण्याच्या उद्देशाने काही अन्य शक्तिशाली शासकांसोबत मिळून आपलं गठबंधन केलं.

विलक्षण प्रतिभाचे धनी असणारे आचार्य चाणक्य खूप बुद्धिमान आणि चतुर व्यक्ती होते.

त्यांनी आपल्या बुद्धीच्या जोरावर मगध क्षेत्रातील पाटलीपुत्रच्या नंद वंशाचा विनाश करण्याची योग्य रणनीती तयार केली आणि त्यांचा सर्वनाश केला.


पाटलीपुत्र मधील नंद वंशातील शेवटच्या सम्राटाचे पतन केल्यानंतर तेथील नंद वंश संपुष्टात आला. त्यानंतर आचार्य चाणक्य यांनी पाटलीपुत्र येथे चंद्रगुप्त यांच्या सोबत मिळून नविन “मोर्य साम्राज्य”  स्थापण केले.

चन्द्र्गुप्त यांच्या या “मोर्य साम्राज्यात” आचार्य चाणक्य यांनी राजनीतिक सल्लागार म्हणून आपली सेवा दिली.


◆ आचार्य चाणक्य यांची मोर्य साम्राज्याच्या विकासातील प्रमुख भूमिका:


आचार्य चाणक्य यांनी आपल्यला धोरणाखाली चंद्रगुप्त यांच्या सोबत मिळून नंद अंश संपुष्टात आणले आणि त्या ठिकाणी आपले नविन साम्राज्य स्थापण केलं.

चंद्र्गुप्तांचे हे नविन साम्राज्य म्हणजेच “मोर्य साम्राज्य’ होय. ते साम्राज्य त्यांनी गांधार येथे स्थापण केले होते.

“मोर्य साम्राज्याचे” शासक चंद्रगुप्त मोर्य यांनी अलेक्जेंडर द ग्रेट (सिकंदर) यांच्या सेनापत्यांचा पराभव करण्यासाठी वर्तमानातील अफगानिस्तान पर्यंत त्यांचा पाठलाग केला होता.


आपली चाणक्य बुद्धी आणि निर्दयी वृत्ती तसचं महान धोरणांच्या साह्याने आचार्य चाणक्य यांनी चंद्रगुप्त यांच्या मोर्य साम्राज्याला त्याकाळी सर्वात शक्तिशाली बनविण्यात आपली महत्वपूर्ण भूमिका बजावली होती.

चाणक्य यांच्या रणनीतीच्या साह्याने चंद्रगुप्त मोर्य यांच्या मोर्य साम्राज्याचा विस्तार पश्चिमेकडील सिंधू नदीपासून पूर्वेकडील बंगालच्या खाडीपर्यंत करण्यात आला.

मोर्य साम्राज्याने पंजाब प्रांतावर देखील आपला ताबा मिळविला होता. अश्या प्रकारे मोर्य साम्राज्याचा विस्तार पूर्ण भारतभर करण्यात आला.


आचार्य चाणक्य यांनी “अर्थशास्त्र” या ग्रंथात  युद्ध, दुष्काळ आणि महामारीच्या वेळेला राज्याचे नियोजन कश्याप्रकारे करायला पाहिजे या गोष्टींची सखोल माहिती दिली आहे.

जैन ग्रंथात वर्णीत एक लोकप्रिय आख्यायिकेनुसार (किंवदंती), आचार्य चाणक्य हे सम्राट चंद्रगुप्त यांच्या जेवणात चिमूटभर विष मिळवीत असतं, जेणेकरून त्यांना  विष पचवण्याची सवय होईल.

चंद्रगुप्त मौर्य यांनी शेवटच्या काळात जैन धर्म स्वीकारला व आपले राज्य मुलगा बिंदूसार यांचे कडे सोपवले.
तसेच, आचार्य चाणक्य यांनी बिंदुसार यांच्या साम्राज्यात देखील काही काळापर्यंत सल्लागार म्हणून काम पाहिलं.


◆ आचार्य चाणक्य यांचा मृत्यू: Chanakya Death


आतिशय प्रतीभावशाली शैलीचे धनी, बुद्धिमान तसेच भारतीय अर्थशास्त्र ग्रंथाचे रचना करणारे महान अर्थशास्त्रज्ञ आचार्य चाणक्य यांचा मृत्यू ईसा पूर्व २७५ मध्ये झाला. त्यांच्या जन्मा प्रमाणे त्यांचा मृत्यू देखील अनेक प्रकारच्या रहस्यांनी वेढलेला आहे.

त्यांच्या मृत्यू बद्दल अनेक मते आहेत. परंतु त्यांचा मृत्यू कसा झाला व कोठे झाला हे अजूनही एक रहस्यच आहे.

एका कथेनुसार त्यांचा मृत्यू अन्न पाण्याचा त्याग केल्यामुळे झाला. तसेच, इतर कथेनुसार, चंद्रगुप्त मोर्य यांचे पुत्र बिंदुसार यांच्या शासन काळात आपल्या राजनीतिक षडयंत्रामुळे त्यांचा मृत्यू झाला.


◆ चाणक्य नीती: Chanakya Niti in Marathi


जो पुरुष अध्ययन करून धर्माच्या उपदेशाविषयी प्रसिद्ध करावयास योग्य, अयोग्य, चांगलें, वाईट, इत्यादि शास्त्राप्रमाणे जाणतो, तो श्रेष्ठ होतो.

मूर्ख शिष्यास उपदेश केल्याने, आणि दुष्ट स्त्रीचे पोषण केल्याने तसेच दुःखितजनांच्या अतिसहवासानें विद्वान्ही दुःख पावतो.

ज्याची स्त्री दुष्ट, आणि मित्र तोहि वंचक, तसाच प्रत्युत्तर देणारा चाकर व सर्पयुक्त गृहीं निवास, त्यांस मृत्युच प्राप्त; यांत संशय नाही.

पुढे आपत्ति प्राप्त होईल म्हणून धनाचे रक्षण करावें, जर स्त्रीनाश संभवला तर धनेकरून स्त्रियांचे रक्षण करावें आणि जर आपला नाश होत असेल तर द्रव्य व स्त्रियाही देऊन आत्मरक्षण करावें.

आपत्ति प्राप्त होईल म्हणून धनसंग्रह करावा असे नीतिशास्त्र सांगते; परंतु श्रीमंतास आपत्ति काय करणार आहे? असे जर म्हणावे तर कोणे एके समयीं लक्ष्मीही नाश पावते; आणि धनसंग्रहही नाश पावतो. यास्तव दान–भोगादि सद्व्यय करावा; हाच आपदर्थ धनसंग्रह.


ज्या गावांत धनवान, श्रोत्रिय ब्राह्मण, राजा, नदी, वैद्य ही पांच नाहीत; तेथें एक दिवसही राहूं नये. अशा स्थळी जो राहील तो सुख पावणार नाही.

ज्या देशी लोकांच्या देहनिर्वाहाविषयी कोणताही उपाय, कोणाचेही भय, दक्षपणा आणि दानस्वभाव हीं नाहींत; तेथें ज्ञात्याने कदापि राहूं नये.

कामावरून नोकराची, संकटकाळी बांधवांची, आपत्तिकाळी तसेच वैभवक्षयाचे वेळी पत्नीची परीक्षा होते.

रोगप्राप्तिकाळी, संकटकाळी, धान्यपत्तीचे वेळी, शत्रुसंकटकाळी, राजाद्वारीच्या कामाचे वेळी, आणि स्मशानांत या ठिकाणी जो आपणांस साथ करितो तोच बांधव जाणावा.

जो अविनाशी वस्तु सोडून नाशीवंत वस्तुच्या पाठीस लागतो तो अविनाशी वस्तु सोडतोच पण नाशिवंत वस्तु नाश पावल्याने या दोन्ही वस्तूंना मुकतो.

बुद्धिमान पुरुषानें कन्या वरतांना ती थोडी रूपहीन असली तरी उत्तम कुळांतील करावी, रूपानें संपन्न पण नीच कुळांतील कन्या वरूं नये कारण विवाहादि संबंध आपले बरोबरीच्या कुळाशी करावा.

नदी आणि श्वानादि नखांची जनावरे, गवादिक शिंग असलेले पशु, निरंतर हातीं शस्त्र बाळगणारे, स्त्रिया तसेच राजकुल यांचा कदापि विश्वास करूं नये.

विषापासूनही शोधून अमृत घ्यावें, अमंगळांत पडलेले सुवर्ण क्षालनादि करून घ्यावें, उत्तम विद्या नीचापासूनही घ्यावी, तर कन्या जर सर्वगुणसंपन्न असेल तर ती नीचकुळांतील असेल तरी वरावी.

पुरुषांच्या तुलनेत स्त्रिचा आहार द्विगुणित, लज्जा चतुर्गुणित, साहसकर्म (अविचाराने वागणे) सहापट तर कामेच्छा आठपट असते असे जाणावें.

मिथ्या भाषण, अविचारानें काम करणे, कपट, मूर्खपणा, अतिलोभ, अमंगळपणा, आणि निर्दयपणा हे सात स्त्रियांचे स्वाभाविक दोष जाणावें.

खाद्यपदार्थ उपलब्ध असतांना भोजनशक्ति असणे, स्त्री उपलब्ध असतां रतिशक्ति असणे, वैभव प्राप्त असतां दानशक्ति असणे, हे मोठे पुण्याचे फळ होय.

पुत्र ज्याच्या स्वाधीन आहेत, पत्नी मनाप्रमाणे वागणारी आहे, व जो प्राप्त वैभवाचे ठायीं संतुष्ट आहे, त्याला इहलोकींच स्वर्गसुख आहे.

पित्याचे भक्तिपूर्वक आज्ञापालन करणारे तेच खरे पुत्र, पुत्रांपासून पुढे सुखाची अपेक्षा न करितां जो पोषण करतो तोच खरा पिता, ज्याच्यावर पूर्ण विश्वास टाकणे शक्य आहे तोच खरा मित्र, आणि जिच्यासंगें सुखप्राप्ति होते तीच खरी भार्या.

विषाने भरलेल्या परंतु मुखीं दुध असलेल्या कुंभाप्रमाणे समक्ष प्रिय व हितकर बोलणाऱ्या परंतु पाठीमागें कार्यनाश करूं पहाणाऱ्या कुमित्राला जवळ करू नये.

कुमित्राचे ठायीं विश्वास ठेवू नये, आणि मित्रावरही विश्वास करूं नये; कारण कांहीं कारणवशात् मित्र रागावला तर तो आपले गुहय सर्व लोकांमध्ये उघड करण्यास चुकणार नाही.

मनांत योजिलेले कार्य वाणीनें प्रसिद्ध करूं नये, मसलतीने गुप्तपणे आखणी करून कार्याचे नियोजन करावें. (पूर्वप्रसिद्धीने कार्य सिद्ध होण्यास अडथळे येतात)

मूर्खपणा दुःखदायक असतो तसेच तारुण्यही दुःखदायक असते परंतु या दोहोंपेक्षां दुसऱ्याचें घरीं रहावे लागणे हे तर फारच दुःखदायक होय.

पर्वताचे ठायीं आढळणारे रत्न सर्वच पर्वतांचे ठायीं मिळत नाहीत; हत्तीचे ठायी असणारे मोती सर्वच हत्तींचे ठायीं असत नाहींत; साधु लोकांचा वास सर्वच ठिकाणी नसतो तसेच चंदन वृक्ष सर्वच वनांमध्ये आढळत नाहींत.

विद्वान लोकांनी आपल्या पुत्रांना विविध गुणांनी संपन्न करण्याचा सतत प्रयत्न करावा. कारण असे नीति व शीलसंपन्न पुत्र आपल्या कुळांत पूज्य होतात.

आपल्या मुलांना शिक्षण न देणारी माता त्यांची शत्रु असून असा पिता त्यांचा वैरी होय. हंसांच्या समूहांत जसा बगळा शोभत नाही तसे ते अशिक्षित पुत्र विद्वानांच्या सभेत मान्यता पावत नाहीत.

मुलांचे अतिलाड करण्याने ती बिघडण्याची तर वेळीच योग्य शिक्षा करण्याने ती सद्गुणी बनण्याची शक्यता असते तरी शिक्षणाचे बाबतीत पुत्राचे वा शिष्याचे लाड न करता त्यांना वेळीच ताडन करून सद्गुणी बनवावें.

एक श्लोक किंवा अर्धश्लोक, अथवा एकपाद, शेवटी एक अक्षर तरी प्रतिदिनी वाचावें; तसेच दान अध्ययनादि कर्मे करून दिवस कारणी लावावा.(अवंध्य करावा)

स्त्रीवियोग, स्वजनांपासून अपमान, युद्धामध्ये जिवंत राहणे, दुष्टराजाची सेवा, दरिद्रीपणा व विषमसभा ही सहा प्रकारची दुःखें प्राप्त झाली असतां ती माणसाचा देह अग्निवांचून जाळतात.

नदीतीरावरील वृक्ष, परगृही जाणारी तरुण स्त्री, प्रधानावांचून असलेला राजा, ही लवकरच नाश पावतात; यांत संशय नाही.

विद्या हे ब्राह्मणांचे बल होय, तर राजाचें बल त्याचे सैन्य हे होय, वित्त हे वैश्यांचे बल होय तर शूद्रांचे बल म्हणजे त्यांचा सेवाभाव हा होय. (या बळांविना ते शोभून दिसत नाहींत.)

द्रव्यहीन पुरुषाला वेश्या त्यागितें, शक्तिहीन राजाला प्रजा सोडून जाते, फलहीन वृक्षाला पक्षी सोडून जातात तर अभ्यागत भोजन झाल्यावर त्या गृहाचा त्याग करून जातात.

ऋत्विज ब्राह्मण दक्षिणा घेतल्यावर यजमानाला सोडून जातात, विद्याप्राप्तिनंतर शिष्य गुरूला सोडून जातात तर अरण्याला आग लागती असतां पशु ते वन सोडून जातात. (एखाद्यापासूनचा कार्यभाग आटोपल्यावर त्याचा त्याग करण्यात येतो.)

ज्याचे आचरण दुष्ट, ज्याची दृष्टी पापी, ज्याचा अमंगळ सीनी निवास, व सर्व लोकांत दुष्ट म्हणून ख्याति असलेला अशा पुरुषाशी जो मैत्री करतो तो लवकरच नाश पावतो.

आपल्यासमान असणाऱ्यांवर प्रीति केली असतां ती शोभून दिसते, सेवा राजाची केली असतां ती शोभते, व्यवहारामध्ये वाणिज्य शोभून दिसते तर सुंदर स्त्री स्वगृहींच शोभून दिसते.

 

क्न्या उत्तम कुलांत योजावी (उत्तम कुलांत द्यावी), पुत्रांना उत्तम विद्या प्राप्त करून द्यावी, शना संकटांत योजावें (संकटांत पाडावें) तर प्रियवस्तु धर्मकार्यांस लावावी.


दुर्जन आणि साप या दोहोंमध्ये साप बरा. कारण साप कदाचित् कालेंकरून दंश करतो तर दुर्जन पदोपदी मर्मच्छेद करितो.

दुर्जन फार घातक असल्यामुळे राजे लोक कुलीनांचा संग्रह करितात कारण कुलीन कुठल्याही परिस्थितीत त्यांचा त्याग न करितां त्यांचे पाठीशी उभे रहातात.

प्रलयापूर्वी शांत असणारे सागर प्रलयकाळी मर्यादा ओलांडतात. मात्र सर्वत्र अभेद पाहणारे साधुपुरुष प्रलयकालींही मर्यादा ओलांडत नाहींत.

मूर्ख माणसाला आपल्यापासून दूर करावें कारण की तो दोन पायांचा पशुच होय. अनवधानानें कांटा जसा रुततो तसा मूर्ख आपल्या वाग्बाणांनी सर्वांचा भेद करतो.

रूपानें व यौवनानें संपन्न असलेले व श्रेष्ठ कुलांतलें पुरुष जर विद्याहीन असतील तर ते सुगंधरहित फुलें असलेल्या पळसाच्या वृक्षाप्रमाणे शोभा देत नाहीत

कोकिलांचे रूप म्हणजे त्यांचा स्वर तर स्त्रियांचे रूप म्हणजे त्यांचे पातिव्रत्य. विद्या हे कुरूप पुरुषांचे रूप तर तपस्व्यांचे रूप क्षमा हे होय.

कुलाच्या रक्षणाकरितां एकाचा त्याग करण्यास हरकत नाहीं तर गांवाचे रक्षण होत असेल तर एक कुलही त्यागण्यास हरकत नाही. संपूर्ण देशाच्या रक्षणासाठी एका गावासही काढण्यास हरकत नाही तर आत्मनाश होत असेल तर पृथ्वीही सोडून आत्मरक्षण करावें.

थ्नरंतर उद्योग करणाऱ्यांस दारिद्र्य प्राप्त होत नाही तर भगवन्नामाचा जप करणाऱ्यांस पातकांची बाधा होत नाहीं मौन धारण करणाऱ्यास कलहाची शक्यता नाहीं तर जागृत असणान्यांस कसलेही भय वाटत नाही.

अत्यंत रूपवान् असल्याने सीतेचे हरण झालें, संपत्ति-सामर्थ्यादिकांचा अतिगर्व झाल्यामुळे रावणाचा नाश ओढवला, दानाचा अतिरेक केल्यामुळे बळीस पाताळांत जावे लागले यासाठी कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळावा.

समर्थ माणसाला कोणतेही काम भारभूत वाटत नाही तर व्यवसाय करणाऱ्यांस कोणतेही ठिकाण फार दूर वाटत नाही. विद्वान् पुरुषाला कोणताही देश परका वाटत नाही तर प्रिय बोलणान्यास कोणताही माणूस परका नसतो.

ज्याप्रमाणे उत्तम सुगंधयुक्त पुष्पांनी भरलेल्या एका वृक्षानेही सर्व सुगंधित होते त्याप्रमाणे केवळ एका सुपुत्राच्या योगानें सर्व कुल शोभायमान होतें.

ज्याप्रमाणे अग्नीने जळणाऱ्या वनांतील एका शुष्क वृक्षामुळे सर्व वन जळून जाते त्याप्रमाणे एका कुपुत्राचे योगानें सर्व कुल नाश पावते.

ज्याप्रमाणे चंद्रामुळे रात्र जशी सर्वांना आनंदकारक व शोभायमान होतें त्याप्रमाणे विद्वान् आणि साधुचरित अशा एका सुपुत्रामुळे सर्व कुल शोभायमान व आनंददायक होतें.

शोक व संताप देणारे बरेच पुत्र असून त्यांचा उपयोग काय? त्यापेक्षां सर्व कुलाला आश्रयभूत वाटणारा असा एकच पुत्र असणे बरें.

पहिली पांच वर्षे पुत्राचे लाड करावेत, पुढील दहा वर्षे प्रसंगी ताडन करूनही शिकवावें मात्र तो सोळा वर्षांचा होताच त्याच्याशी मित्राप्रमाणे आचरण करावें.

पीडा प्राप्त झाली असतां, परचक्र म्हणजे शत्रुसेना आली असतां, भयंकर दुष्काळ पडला असतांना तसेच दुष्ट लोकांचा सहवास प्राप्त झाला असतां, जो पलायन करितो तोच वाचतो

जन्मजन्मांतरी सुद्धां ज्यांस धर्म, अर्थ, काम, मोक्ष यापैकी एकही पुरुषार्थ घडला नाही त्याचे मरण व्यर्थ होय. जन्माला येऊन पुरुषार्थ घडला तरच ते मरण सफल होय.

ज्या गृहीं मूर्खाचा सत्कार होत नाही, जेथें धान्यसंग्रह निरंतर असतो आणि जेथें पति-पत्नीमध्ये कलह होत नाहीं त्या गृहीं लक्ष्मी आपणच येऊन स्थिर होतें.

 

माणूस साधु झाल्यावर त्याचे बरेचसे पुत्रमित्रादि बांधव त्याच्यापासून दूर होतात; व जे त्यांस अनुसरून चालतात त्यांच्या सद्धर्माने सर्व कुल पवित्र होते.

मत्सी,कांसवीण,व पक्षिणी दर्शन, ध्यान व स्पर्श यांच्या योगानें आपापल्या पिलांचे पालन करतात; तद्वत सज्जनसंगतिमुळे दर्शनादिकांनी दीनजनांचे संरक्षण होतें.

हा देह निरोगी व स्वाधीन आहे तेव्हांच मानवाने आत्महित साधण्याच्या मागे लागले पाहिजे. अन्यथा अचानक प्राणांत झाल्यावर काय आत्महित साधणार ?

विद्येचे गुण कामधेनुसारखे आहेत जसे की अकाली फल देणे; प्रवासांत ती मातेप्रमाणे पोषण करिते म्हणून विद्येला गुप्तधन संबोधिले जाते.

गुणरहित अशा शंभर पुत्रांपेक्षां गुणवान् असा एकच पुत्र असणे बरे, जसे एकच चंद्र अंधार नाहीसा करतो तर तारा हजारो असूनही त्यांचा काही उपयोग नाही.

मूर्ख पुत्र जन्माला येऊन चिरायु होण्यापेक्षां तो मृतच जन्माला आलेला बरा; कारण मृतपुत्र अल्पकाळच दुःख देतो तर शतायुषी जडपुत्र यावज्जीव आपल्या देहाला जाळत असतो.

कुग्रामांत निवास, कुलहीनाची सेवा, कदान्न भोजन, क्रोधमुखी पत्नी, मूर्ख पुत्र आणि विधवा कन्या ही सहा आपल्या देहाला अग्निवांचून जाळतात.

ज्याप्रमाणे दूध न देणाऱ्या व गर्भिणीही न होणाऱ्या गाईचा काहीही उपयोग नाहीं त्याप्रमाणे जो विद्वानही नाहीं व भक्तिमानही नाही अशा पुत्राचा काहीही उपयोग नाही.

संसारतापांत जळणाऱ्या लोकांना तीनच विश्रांतीस्थाने आहेत. सुंदर अपत्य, सुमुखी भार्या व तिसरी साधुसंगति जी इहलोकीं सुख देवून मुक्तीही प्राप्त करून देते.

राजाचे भाषण तसेच पंडिताचे भाषण पूर्णविचारपूर्वक असे एक वेळाच होते तसेच कन्यादानही एक वेळाच केले जाते ( कुलशीलादि गुणविचार करून ) अशाप्रकारें राजभाषण, पंडितभाषण व कन्यादान ही तीन्ही एकवेळच संभवतात.

तपाचरण एकानेंच करावें, अध्ययन दोघांनी करावें, गायनासाठी तिघेजण असणे योग्य, गमन–प्रवास चौघांनी करावा तर शेतीकाम पांचजणांनी करावें मात्र युद्ध करण्यास फार लोकांची आवश्यकता असतें

जी पत्नी पवित्र कर्माचे ठायीं दक्ष व चतुर, पतिव्रता, पतिवर अखंड प्रेम करणारी व सत्यवादी असतें तीच योग्य पत्नी होय.