डॉ. नरेंद्र दामोदर जाधव (इ.स.१९५३ - हयात)
हे भारतीय अर्थशात्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, लेखक व समाजशास्त्रज्ञ आहेत. ते रिझर्व्ह बँकेचे मुख्य आर्थिक सल्लागार आहेत. अर्थशास्त्र आणि ललित साहित्य तसेच इतर समाजिक विषयांवर मराठी, हिंदी व इंग्लिश भाषांत त्यांनी लेखनही केले आहे. नियोजन मंडळाचे माजी सदस्य होते.
निवासस्थान - भारत
राष्ट्रीयत्व - भारतीय
धर्म - बौद्ध धम्म
कार्यक्षेत्र - अर्थशास्त्र, शिक्षण, समाजशास्त्र, लेखक
प्रशिक्षक - मुंबई विद्यापीठ, इंडियाना विद्यापीठ डॉक्टरेटचे मार्गदर्शक - प्रा. ग्रीन, प्रा. फुरस्टनबर्ग
वडील - दामोदर जाधव
आई - सोनाबाई जाधव
पत्नी - वसुंधरा जाधव
अपत्ये - तन्मय, अपूर्वा
◆ जीवन
मे २८, इ.स. १९५३ रोजी त्यांचा जन्म एका सामान्य दलित महार कुटुंबात झाला व इ.स. १९५६ त्यांच्या कुटूंबीयांनी बौद्ध धम्म स्वीकारला. वडाळ्याच्या वस्तीत जाधवांचे बालपण गेले. ’आमचा बाप आणि आम्ही’ या मराठी पुस्तकात त्यांनी आत्मचरित्र मांडले आहे. जगातल्या वीस भाषांमध्ये त्याचे अनुवाद झाले आहेत.
◆ शिक्षण
जाधवांनी मुंबई विद्यापीठाकडून १९७३ साली संख्याशास्त्र हा विषय घेऊन बी.एस्सी. (विशेष नैपुण्यासह प्रथम वर्ग) आणि १९८६ अमेरिकेच्या इंडियाना विद्यापीठातील अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट मिळवली. या विद्यापीठाकडून 'सर्वोत्कृष्ठ आंतरराष्ट्रीय विद्यार्थी' हा विशेष बहुमान मिळवला.
◆ कारकीर्द
डॉ. जाधव यांची रिर्झव्ह बॅंकेतली ३१ वर्षांची कारकीर्द. त्यांनी ऑक्टोबर २००८ मध्ये 'प्रिन्सिपल ॲडव्हायजर ॲन्ड चीफ इकॉनॉमिस्ट' या पदावरून स्वेच्छानिवृत्ती घेतली. रिझर्व बॅंकेत असताना ते अफगाणिस्तान सेंट्रल बॅंकेचे प्रमुख सल्लागार होते व साडेचार वर्षे 'आंतरराष्ट्रीय नाणेनिधी'मध्येही होते. तसेच ते पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते.
◆ लेखन
नरेंद्र जाधव यांनी तीन भाषेत ३७ पुस्तके लिहिली आहेत - इंग्रजीमध्ये १९, मराठीत १३, आणि हिंदीमध्ये ३ , ३०० पेक्षा अधिक शोध पेपर आणि लेख. या पुस्तकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर २१ पुस्तके आणि रवींद्रनाथ टागोरांवर ३ पुस्तकेज्यात विश्लेषणात्मक जीवनचरित्र आणि निवड कविता, लघु कथा, नाटक, विडंबने, लेख आणि भाषण यांच्या अनुवादाचा समावेश आहे.
◆ मराठी पुस्तके
• युगपुरूष महामानव – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (चित्रमय चरित्र, बृहन मुंबई महानगर पालिका, २०१६)
• प्रज्ञासूर्य डॉ. आंबेडकर : समग्र वैचारिक चरित्र (ग्रंथाली, मुंबई, २०१४)
• प्रज्ञा महामानवाची : डॉ. बाबासाहेब आंबेडकर समग्र लेखनकार्य (संपादन) खंड १: राजकिय लेखन
• प्रज्ञा महामानवाची : डॉ. बाबासाहेब आंबेडकर समग्र लेखनकार्य (संपादन) खंड २: अर्थशास्त्र, समाजशास्त्र, कायदा-संविधान आणि धर्मशास्त्र (ग्रंथाली, मुंबई, २०१३)
• लसावी माझ्या समग्र अभिव्यक्तीचा (ग्रंथाली, मुंबई, २०१३)
• बोल महामानवाचे : ५०० मर्मभेदी भाषणे (संपादन) खंड १ : आत्मनिवेदन, अनुयायी मार्गदर्शन आणि समग्रसूची
• बोल महामानवाचे : ५०० मर्मभेदी भाषणे (संपादन) खंड २ : सामाजिक, आर्थिक, धार्मिक आणि कायदा-संविधान विषयक भाषणे
• बोल महामानवाचे : ५०० मर्मभेदी भाषणे (संपादन) खंड ३ : राजकिय भाषणे (ग्रंथाली, मुंबई, २०१२)
• रविंद्रनाथ टागोर: युगनिर्माता विश्वमानव (ग्रंथाली, मुंबई, २०११)
• रविंद्रनाथ टागोर: समग्र साहित्य दर्शन (ग्रंथाली, मुंबई, २०११)
• भयशून्य चित्तजेथ: रविंद्रनाथांच्या १५१ प्रतिनिधीक कविता (ग्रंथाली, मुंबई, २०१०)
• आमचा बाप आणि आम्ही: (ग्रंथाली, मुंबई, १९९३) (१९९ वी आवृत्ती)
• डॉ. आंबेडकर: आर्थिक विचार आणि तत्त्वज्ञान (सुगावा प्रकाशन, पुणे १९९२)
✒️ आपल्या भाषेत मराठी भाषेत 🇮🇳