adsense

कर्मवीर भाऊराव पाटील यांची माहिती : Karmaveer Bhaurao Patil Biography

कर्मवीर भाऊराव पाटील 

कर्मवीर भाऊराव पाटील
Karmaveer Baburao Patil Information in Marathi


मोठी देणगी देतो, पण कॉलेजला दिलेले शिवाजी महाराजांचे नाव बदलून आपल्या वडिलांचे नाव द्या, असे एका धनिकाने म्हणताच त्याला "एकवेळ जन्मदात्या बापाचं नाव बदलेन, पण कॉलेजला दिलेले शिवाजी महाराजांचे नाव बदलणार नाही" असं ठणकावून सांगणारे “कर्मवीर भाऊराव पाटील.” ग्रामीण भागातील शिक्षणाची गरज ओळखणारा शिक्षणमहर्षी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची माहिती आपण या लेखात घेणार आहोत.


रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक भाऊराव पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी झाला. सांगली जिल्ह्यातील ऐतवडे बुद्रुक हे त्यांचे मूळ गाव होय.


ग्रामीण भागातील प्रश्न जर सोडवायचे असतील, तर तेथे शिक्षणाचा प्रसार होणे अत्यंत जरुरीचे आहे असे त्यांना वाटले, म्हणून त्यांनी ऑक्टोबर १९१९ मध्ये रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली.


छत्रपती शिवाजी कॉलेज हे रयत शिक्षण संस्थेचे पाहिले कॉलेज सातारा येथे सुरु झाले. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून भाऊरावांनी केवळ शिक्षणच नव्हे, तर समता, बंधुता, श्रमप्रतिष्ठा, सामाजिक बांधिलकी आदि मूल्यांची शिकवण विद्यार्थ्यांना दिली.



भाऊरावांनी सातारा येथे महाराजा सयाजीराव हायस्कूल या नावाने देशातले 'कमवा आणि शिका' या पद्धतीने चालणारे पहिले मोफत निवासी हायस्कूल सुरू केले.


श्री. छत्रपती शाहू महाराज बोर्डिंगचा खर्च भागविण्यासाठी रोख व धान्यरूपाने भाऊराव मदत गोळा करीत. हे वसतिगृह चालवण्यासाठी त्यांच्या पत्नीस स्वतःचे मंगळसूत्र व दागिनेही विकावे लागले.


रयत शिक्षण संस्थेची आज ४२ महाविद्यालये, ४४४ माध्यमिक शाळा, ६२ प्राथमिक शाळा, ९१ होस्टेल्स असून ४.५ लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.


महाराष्ट्राच्या जनतेने भाऊराव पाटलांचा कर्मवीर ही पदवी देऊन गौरव केला. तसेच भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवले.