adsense

YouTube'r अमित भडाना यांचा जीवनप्रवास - Amit Bhadana biography in marathi

अमित भडाना

         अमित भडाना हा सुप्रसिद्ध यूट्यूबर आहे. त्यांच्या ‘अमित भडाना’ या यूट्यूब चॅनलचे दोन कोटी पेक्षा अधिक सब्सक्राइबर आहेत. तो यूट्यूब वरून चांगला पैसा कमवतो. त्याचे यूट्यूब व्हिडिओ तरुणांमध्ये चांगलेच पसंत केले जातात. अमित भडाना यांनी त्यांच्या नावाचा ब्रँड केला आहे. अमित भडानीच्या स्वदेशीपणामुळे लाखो मुलींचा तो चाहता झाला आहे.


Amit Bhadana biography in marathi
Amit Bhadana Mahiti
 

◆ अमित भडाना यांचे वैयक्तिक जीवन

     अमित भडाना यांचा जन्म 07 सप्टेंबर 1994 रोजी दिल्लीत झाला. त्याचा जन्म गुर्जर समाजात एका साध्या कुटुंबात झाला.

अमित भडाना यांचे सुरुवातीचे शिक्षण यमुना विहार शाळेत झाले. यमुना विहार दिल्लीच्या ईशान्य भागात येतो. सर्वांना हसताना पाहून अमित भडानाला आनंद होतो.

अमित भडानाच्या घरी त्याची आई, आजी, काका  राहतात. त्याला लहानपणापासूनच क्रिकेट खेळायचा खूप आवड होता, परंतु अमितला लहानपणापासून त्याला मोठे करणारे त्यांचे काका ह्यांना अमितने क्रिकेट खेळलेले आवडत नसे, त्यांना अमितने वकील बनवून त्यांच्या घराचे नाव उज्ज्वल करावे असे त्यांचे स्वप्न होते.

अमित भडाना यांनी लहानपणापासूनच देशी जीवन  स्वीकारले होते. अमित भडानाच्या वैयक्तिक जीवनाबद्दल बोलायचं झालं तर त्यांचे मित्रच त्यांचे सर्वकाही आहेत.

◆  करियर

    अमित भडाना मनाने खूप स्वच्छ आहेत. अमित भडाना अभ्यासामध्ये खूप चांगले आहेत. ज्यामुळे त्यांनी वकिलीसारखा विषय निवडला पण विनोद करण्याच्या त्यांच्या आवडीमुळे ते आजचे खूपच प्रसिद्ध विनोदी कलाकार बनले आहेत.

◆अमित भडानाचा पहिला व्हिडिओ 

     अमित भडानाने आपला पहिला व्हिडिओ फेसबुकवर टाकला होता, काही दिवसांनंतर त्याला लोकांकडून खूप प्रतिसाद मिळाला. प्रत्येकाने विनंती केली की अमितने अधिक व्हिडिओ बनवावेत. अमित लाजाळू स्वभावाचा असल्याने सुरुवातीला त्याला कॅमेर्‍याला सामोरे जाण्याची इच्छा नव्हती. व्हिडिओमध्ये त्याला आपला चेहरा दाखवायचा नव्हता. पण त्याच्या मित्रांनी त्याला प्रोत्साहन दिलं आणि अमितने आणखी एक व्हिडिओ बनवला. हा व्हिडिओ 18 फेब्रुवारी 2017 रोजी अपलोड केला. परंतु त्यांच्यापैकी बरेचजण म्हणाले की या क्षेत्रात फारसे यश मिळत नाही, त्यांनी त्यांच्या वकिलीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.

● YouTube करियर

      अमित भडाना यांनी आयुष्यात खूप संघर्ष केला. ते सुद्धा एका सामान्य कुटूंबातून आले आहेत. अमित भडाना यांनी 1 मार्च 2017 रोजी पहिला व्हिडिओ आपल्या यूट्यूब वाहिनीवर अपलोड केला. सुरुवातीला त्यांना बर्‍याच समस्यांचा सामना करावा लागला पण नंतर त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळत गेला.

      अमित भडानाच्या सर्व व्हिडिओंमध्ये तो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवतो की अपमानास्पद आणि अश्लील शब्द व्हिडिओत वापरू नयेत. सध्याच्या काळात लोकांचे मनोरंजन करण्यासाठी बरेच लोक स्वत: चे यूट्यूब चॅनेल तयार करतात, पण अमित भडाना सारखा कोणीही नाही, असं मी नाही तर भारतीय जनता म्हणते.

त्याचे चॅनेल हे भारतातील सर्वाधिक पाहिले जाणारे यूट्यूब चॅनेल आहे. सोशल ब्लेडच्या म्हणण्यानुसार अमित भडानाचे चॅनल जगात 296 क्रमांकावर येते. अमित भडानाने बरीच व्हिडीओ तयार केली आहेत आणि आता त्यांना चित्रपटांच्या ऑफरही आल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच अमित भडानाने त्यांचे एक गाणे लॉन्च केले ''परिचय" हे गाणे पाहून अमित भडाना यांचे संपूर्ण चरित्र कळते.

      अमित भडानाच्या या आपल्या विनोदी शैलीमुळे आज संपूर्ण भारतभर तरुणांमध्ये लोकप्रिय आहे. आज तो जे काही आहे तो केवळ आणि केवळ त्याच्या प्रेक्षकांमुळे आहे, असे तो म्हणत असतो.

◆ अमित भडानाचे उत्पन्न 
Amit Bhadana Income

        अमित भडाना व त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून बरेच व्हिडिओ बनवले आहेत आणि ते भरपूर पैसे कमवत आहेत. त्याच्या ‘अमित बडाना’ या यूट्यूब वाहिनीवरून तो महिन्याला 5 ते 7 लाखांची कमाई करतो. त्याची देसी फनी स्टाईल सर्वांनाच आवडली आहे. सध्या अमित कोट्याधीश झाला आहे. तो कधीही आपल्या उत्पन्नाविषयी सांगत नाही. हा देसी मुलगा एके दिवशी एक मोठा YouTuber आणि सोशल मीडिया व्यक्तिमत्त्व बनेल, असे कोणालाही वाटले नव्हते.

Amit Bhadana biography in marathi
Amit Bhadana Information in Marathi

◆ अमित भडाना यांचे प्रसिद्ध डायलॉग
Famous Dialogues of Amit Bhadana


• तेरे भाई ने कर दी जिम सुरु
   जिसको चाहे उसको लपेट दु

• किसी का कोई जिकर नही है
  तेरे भाई को कोई फिकर नही है

• हसीना गोरी है
  घरन पे रखी पैसा की बोरी है

• 2018 ऐसा है साल
  जिसकी चाहे उसकी दु फाड़

• सफेद है कुर्ता जूता है संतरी
  आजा बनाऊ तुजे आज मंत्री

• तेरे भाई को देख कर मचल गयी
  खुशि खुशि में छत से फिसल गयीं

• माना सकल से है हरामी
  दो चार  है हममे खराबी

• घरन में बेशक ना मारे पेन्ट
  लेकिन गाड़ी पे ना लगने देते डेन्ट

• ये छोटा सा लाला
  यही तो है तेरे भाई का साला

• दिल मे गए हो छा, दो बच्चे करेगे सुरेश और महेश
  क्या बनना चाहोगी उनकी माँ
   
    अमित भडाना यांचा जीवन प्रवास आवडल्यास नक्की शेयर करा...
                
✒️ आपल्या भाषेत मराठी भाषेत 🇮🇳