adsense

डोळे उत्तम राहण्यासाठी 10 टिप्स : How to Keep Your Eyes Healthy

डोळे उत्तम राहण्यासाठी टिप्स

Tips for eye care


टीप 1
डोळ्यांवर ताण येऊ देऊ नये. यासाठी अधिक वेळापर्यंत TV, मोबाईल पाहू नये.
संगणकावर सलग काम करु नये. मधून मधून थोडी विश्रांती घ्यावी.वाचण, शिवणकाम करताना डोळ्यांवर ताण येतो आहे असे वाटल्यास थोडा वेळ विश्रांती घ्यावी.

टीप 2
अति प्रखर प्रकाशाकडे अधिक वेळ पाहू नये. सुर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहू नये.

टीप 3
पुरेशी झोप घ्यावी. रात्री जागरण करु नये. दिवसा झोपू नये.

टीप 4
पित्तवर्धक आहार उदा. अतितिखट, खारट, उष्ण, मसालेदार, चमचमीत, तेलकट पदार्थ अधिक खाऊ नयेत.

टीप 5
अपुऱ्या प्रकाशात लिहिणे, वाचणे इ. गोष्टी करणे टाळावे.
प्रवासामध्ये वाचू नये.

टीप 6
दिवसातून दोन वेळा गार पाण्याने डोळे स्वच्छ करावेत.

टीप 7
रात्री झोपण्यापुर्वी पायांच्या तळव्यांना तेलाने अभ्यंग करुन काशाच्या वाटीने घासल्याने शरीरातील उष्णता कमी होते आणि डोळे निरोगी होतात.

टीप 8
काकडीच्या थंडगार चकत्या, मोगऱ्याचा गजरा, बर्फ रुमालात बांधून डोळ्यावर ठेवून दहा ते पंधरा मिनिटे शांत झोपावे.

टीप 9
संगणकावर जास्त वेळ काम केले तर डोळे थकतात.
अशा वेळी दर दोन ते तीन तासाने पाण्याचा हबका डोळ्यावर मारावा.
मग सुती कपड्याने किंवा रुमालाने डोळे हलकेच टिपावे.

टीप 10
हिरव्या झाडाकडे, फुलदाणीतील फुलांकडे आल्हाद दायक गोष्टीकडे मध्ये-मध्ये पाहावे. डोळ्यांना प्रसन्न वाटते.