adsense

माझी आई : Marathi Nibandha

माझी आई


aai nibandha
Marathi Nibandha on Mother


एकत्र कुटुंबात मी लहानाचा मोठा झालो. आमच्या घरात भरपूर माणसे आहेत आणि ती एकमेकांशी 'नात्याच्या रेशमी धाग्यांनी' जोडलेली आहेत. माझी आई ही या घराची कर्णधार आहे असे म्हणायला हरकत नाही. चाळीशी ओलांडलेल्या माझ्या आईचा या घरात प्रेमळ वावर आहे. माझ्या आजीचा आणि माझ्या आईचा एकमेकींवर पूर्ण विश्वास आहे वि परस्परांमध्ये दाट जिव्हाळा आहे.


अशी ही साझी आई दिवसातून फारच थोडा वेळ माझ्या वाट्याला येत असली, तरी तिचे माझ्या अभ्यासाकडे, माझ्या आवडीनिवडीकडे पूर्ण लक्ष असते. केवळ माझ्याच नव्हे तर आमच्या घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना स्वावलंबनाचे वळण लावण्यामागे, माझ्या आईचाच मोठा सहभाग आहे.

सुट्टीच्या दिवसांत आई घरातील सर्व मुलांना उत्तम पुस्तके वाचून दाखवते. त्यातून स्वाभाविकच आमच्यात वाचनाची आवड निर्माण झाली आहे. आईचे हस्ताक्षर उत्तम आहे. सुलेखन कसे करावे हे मला माझ्या आईनेच शिकवले. घरातील प्रत्येकाची आवडनिवड आईने लक्षात ठेवलेली आहे, त्यामुळे प्रत्येकजण तिच्यावर खूश असतो. नीटनेटकेपणा हा तिचा खास गुण आहे. त्यामुळे घरातल्या कुणालाही काही हवे असले की, त्याला माझ्या आईची आठवण येते आणि माझी आई त्याची नड तत्परतेने भागवते.


माझी आई उत्तम गृहिणी आहे. आल्यागेल्यांचे हसतमुखाने आतिथ्य कसे करावे, ते माझ्या आईकडून शिकावे. स्वयंपाक करण्यात ती कुशल आहे. माझे आजोबा व आजी आपल्या सूनबाईला ' अन्नपूर्णा' असे संबोधून सतत कौतुक करत असतात. शेजारच्या सर्व स्त्रिया अडीनडीला माझ्या आईकडे धावत येतात व आई त्यांना शक्य ती सर्व मदत करते. सदा हसतमुख असणारी ही माझी आई आमच्या घरची 'लक्ष्मी' आहे, असे सारेजण म्हणतात ते उगाच नाही!


...मराठी निबंध !