adsense

प्रवास होणार आणखी महाग! मुंबईत रिक्षाच्या दरात दोन रुपयांनी तर टॅक्सीच्या दरात तीन रुपयांनी होणार वाढ

प्रत्येक ठिकाणी महागाईचे दर वाढत असतानाच आता मुंबईकरांचा प्रवास महागला आहे. पुण्यात रिक्षाच्या दरात वाढ झाल्यानंतर आता मुंबईतही रिक्षा, टॅक्सीचा प्रवास महागणार आहे. मुंबईतील रिक्षा, टॅक्सी यांच्या भाडेवाढीच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे. मुंबईत रिक्षाची दोन रुपयांनी तर टॅक्सीची तीन रुपयांनी भाडेवाढ होणार. दरवाढीच्या या निर्णयावर सोमवारी 26 सप्टेंबर ला शिक्कामोर्तब होणार असल्याचे दिसून येते. दरम्यान 1 ऑक्टोबरपासून मुंबईत रिक्षा,टॅक्सीचा प्रवास महागणार आहे.


Marathi News

काही महिन्यांमध्ये पेट्रोल डिझेल आणि सीएनजीच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होत असताना दुसरीकडे सीएनजी गॅसच्या दरातही वाढ झाली आहे. राज्य सरकारने अर्थसंकल्पात सीएनजी गॅसच्या दरात कपात केली होती. त्यानंतर केंद्र सरकारने सीएनजी गॅसच्या दरात मोठी वाढ केली.

राज्यसरकारकडून भाडेवाढ करण्याबाबत निर्णय न घेतल्यास रिक्षा टॅक्सी चालकांनी 26 तारखेपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला होता. 13 सप्टेंबर रोजी मंत्री उदय सामंत यांच्यासोबत बैठकीत निर्णय न झाल्याने टॅक्सी आणि रिक्षा संघटनांनी संपावर जाण्याचा इशारा दिला होता. रिक्षा, टॅक्सी चालकांच्या संपापूर्वी सरकारकडून तातडीची बैठक घेण्यात आली. सध्या सीएनजी गॅसचा दर 80 रुपयांवर पोहचला आहे. राज्यातील बहुतांशी रिक्षा-टॅक्सी या सीएनजी गॅस आधारीत आहेत. त्यामुळे या दरवाढीचा फटका रिक्षा-टॅक्सी चालकांना बसत होता.