adsense

ख्रिस्तियानो रोनाल्डो यांची माहिती : Cristiano Ronaldo Biography in Marathi

 ख्रिस्तियानो रोनाल्डो


cristiano ronaldo inforamtion in marathi
Cristiano Ronaldo Mahiti Marathi

         क्रिस्टियानो रोनाल्डो हा जगातील अव्वल फुटबॉल खेळाडूंपैकी एक आहे, जो 2020 मध्ये फॉर्ब्स नुसार जगातील सर्वोच्च पेड खेळाडूंपैकी दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांची सक्सेस काही अशी आहे की काही जण त्याला नशिबाचा खेल समजतात. परंतु त्यांचे समर्पण आणि मेहनतीने त्यांचा खेळ एका वेगळ्याच परफेक्शनला नेले आहे.

       क्रिस्टियानो रोनाल्डोचा जन्म 5 फेब्रुवारी 1985 रोजी पोर्तुगालमधील मदेइरा शहरात एका गरीब कुटुंबात झाला. त्यांचे वडील माळी तर आई घरकाम करायची. त्यांचे वडील अमेरिकन प्रेसिडेंट रोनाल्डो रेगनचे मोठे चाहते होते म्हणून त्यांनी त्याच्या नावावर रोनाल्डोचे नाव ठेवले. 


       रोनाल्डोचे वडील दारूचे व्यसनी होते आणि या सवयीमुळे आपल्या पगाराचा अर्धा भाग दारू पिण्यात घालवायचे याच कारणामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती लहानपणापासूनच ठीक नव्हती आणि आर्थिक परिस्थितीमुळे जेव्हा रोनाल्डो त्याच्या आईच्या पोटात होता, तेव्हा त्यांची आईला चौथ्या मुलाला जन्म द्यायचे नव्हते. 

      त्यांनी गर्भपात करण्याचा प्रयत्नही केला होता, परंतु डॉक्टरांनी नकार दिला, कारण हे निसर्गाचे संकेत होते की जगाला एक अधिक चांगल्या पद्धतीचा खेळाडू दिला पाहिजे. 


        रोनाल्डोला लहानपणापासूनच फुटबॉल खेळण्यात खूप रस होता, जेव्हा तो 8 वर्षांचा होता, तो पहिल्यांदा त्याच्या शहराच्या स्थानिक संघाकडून (अँडोरिन्हा फुटबॉल क्लब) खेळला जिथे त्याने खूप चांगली कामगिरी केली. त्याच्या चांगल्या कामगिरीमुळे, तो वयाच्या 10 व्या वर्षी क्लब डेपोर्टिवो नॅसिओनलमध्ये दाखल झाला. 

        तेथे त्याने 2 वर्षे चांगली कामगिरी केली, त्यानंतर तो पोर्तुगालच्या राष्ट्रीय संघात सामील झाला आणि त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे रोनाल्डोची आंतरराष्ट्रीय संघात निवड झाली आणि 2003 मध्ये मँचेस्टर संघाने $19 दशलक्ष डॉलर देऊन त्यांच्या संघात सहभागी करून घेतले.


       पुढील 6 वर्षे रोनाल्डोने मँचेस्टर संघात असताना 84 गोल्स केले, त्यानंतर 2009 मध्ये स्पेनमधील रिअल माद्रिदने रोनाल्डोला सुमारे 108 दशलक्ष डॉलर्स देऊन रोनाल्डोला आपल्या संघात समाविष्ट केले.

       रोनाल्डो हा खेळात खूप चांगला तर आहे, पण इतर मुलांप्रमाणे त्यानेही लहानपणी लाजिरवाणे कृत्य केले होत, जेव्हा तो 14 वर्षांचा होता तेव्हा त्याने शाळेत एका शिक्षकाला खुर्ची फेकून मारली होती, त्यामुळे त्याला शाळेतून काढून टाकले होते, अशा कृतींमुळे तो देखील बाळवयात एक सामान्य मुलांप्रमाणे आगाऊ होता.


        त्यानंतर, जेव्हा तो 15 वर्षांचा होता तेव्हा त्याला रेसिंग हार्ट नावाचा आजार झाल्याचे निदान झाले, ज्यामुळे तो फुटबॉल देखील खेळू शकत नव्हता कारण या आजारामध्ये अचानक हृदयाचे ठोके जलद होतात आणि डोळ्यासमोर अंधार पडतो, परंतु योग्य वेळी या आजारावरील उपचारांमुळे आज आपण त्यांना या ठिकाणी पाहू शकत आहोत.

       समस्या आपल्या जीवनात तात्पुरत्या असतात, आज असतात तर उद्या नसतात त्या जास्त काळ टिकत नाहीत, रोनाल्डोच्या जीवनात सुद्धा हेच बघायला मिळते. आज तो जगातील सर्वात प्रसिद्ध अॅथलीट आहे, रोनाल्डोला ओळखत नसलेला खेळाडूंप्रेमी क्वचितच असेल.