adsense

रॉबर्ट बॉश यांची माहिती : Robert Bosch Biography in Marathi

 रॉबर्ट बॉश


बॉश कंपनीचे संस्थापक

Robert Bosch Information in Marathi



जन्म : २३ सप्टेंबर १८६१


जर्मनीच्या स्टुटगार्टमध्ये सगळी अभियंता मंडळी नवनव्या मोटारींच्या प्रेमात पडत असताना शुद्ध अभियांत्रिकीच्या प्रेमापोटी एक तरुण धडपडत होता. मोटारींसाठी लागणारे सुटे भाग, इंजिनाच्या जोडण्या, वेगवेगळ्या इंधनांच्या इंजिनांसाठी लागणारे वेगवेगळे भाग.. या सगळ्याचा त्याला नाद होता.


त्यासाठीच त्यानं आपली स्वत:ची अशी वेगळी कंपनीच काढली, १८८६ साली. आज १३४ वर्षांनंतरही ही कंपनी अधिकाधिक तरुण होत चालली आहे. ती स्थापन करणाऱ्याचं नाव रॉबर्ट बॉश आणि कंपनी अर्थातच बॉश.


कंपनीची स्थापना जर्मनीच्या स्टुटगार्टमध्ये झाली. गावाच्या मध्यभागी कंपनीचं मुख्यालय आहे. तिथून जवळच टेकाडावर कंपनीनं गावासाठी काढलेलं रुग्णालयही आहे.


साधी दुचाकी असो वा श्रीमंतांच्या गाड्या, विमानांच्या इंजिनाचे भाग बॉशमध्ये बनत नाही असं काही नाहीच.


बॉशच्या जगातील ६० देशांत ४४० पेक्षा जास्त उपकंपन्या असून १२५ ठिकाणी ऑफिसेस आहेत. कंपनीमध्ये सध्या ४ लाख कर्मचारी काम करतात.


भारतात बॉशचे ३१ हजार कर्मचारी असून कंपनीचे भारतीय बाजारमूल्य १२ अब्ज डॉलर्स आहे. कंपनीचा ८४% महसूल ऑटोमोटिव्ह क्षेत्रातून येतो.


बॉशमध्ये होणाऱ्या प्रत्येक संशोधनाचं पेटंट घेतलं जातं. साधारण दिवसाला सरासरी ३० या गतीनं जगभरात ठिकठिकाणी बॉशच्या नावावर पेटंट्स जमा होत असतात. एका वर्षात साधारण ३५०० पेक्षा जास्त पेटंट्स बॉश घेते.