adsense

जॉन डेव्हिसन रॉकफेलर यांची माहिती : John Rockefeller Biography in Marathi

 जॉन रॉकफेलर


स्टैंडर्ड ऑईल कंपनीची स्थापना करणारे तेलसम्राट

John Rockefeller Information in Marathi


◆ ओळख

यांचा जन्मदिन (8 जुलै 1839-23 मे 1937)

जॉन डेव्हिसन रॉकफेलर हे अमेरिकेतील स्टँडर्ड ऑईल कंपनी या प्रचंड मोठ्या तेल उद्योगाचे प्रमुख होते. अमेरिकेतील आजवरचे सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ते गणले जातात. त्यांची त्या काळातील मालमत्ता सुमारे 15000 कोटी डॉलर्स इतकी प्रचंड होती.


◆ जन्म

जॉन रॉकफेलर यांचा जन्म न्यूयॉर्क राज्यातील रिचफर्ड या गावी 8 जुलै 1839 रोजी झाला. त्यांचे वडील एक छोटेसे व्यापारी होते. 1853 मध्ये रॉकफेलर कुटुंब न्यूयॉर्कहून ओहियो राज्यातील क्लीव्हलँड शहरी स्थायिक झाले.


◆ शिक्षण

बॅप्टिस्ट संस्कारांखाली वाढलेल्या जॉन यांनी माध्यमिक शालेय शिक्षण व व्यावसायिक महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. गाणी ऐकायला त्यांना खूप आवडत असे.


◆ स्वतःची कंपनी

रॉकफेलर यांनी 1863 साली आपला भाऊ विल्यम रॉकफेलर आणि काही भागीदार मिळून एक कंपनी स्थापन केली. इतर स्पर्धकांना खाऊन टाकून स्वतःची मोठी कंपनी बनवायची हे त्यांचे तत्त्व होते. उत्पादनाबरोबरच बचतीकडेही अगदी बारीक लक्ष देत असत.


◆ रॉकफेलर प्रतिष्ठान

जगातील मानवजातीच्या कल्याणास चालना देण्याच्या उद्देशाने जॉन. डी. रॉकफेलर यांनी 14 मे 1913 रोजी रॉकफेलर प्रतिष्ठान ही परोपकारी संघटना स्थापन केली. या प्रतिष्ठानाचे वैशिष्ट्य हे की, अन्य निधी व धर्मादाय संस्थांप्रमाणे स्थायिक क्षेत्रापुरते आपले कार्य मर्यादित न ठेवता, ती जागतिक स्तरावर लोकोपयोगी कार्य करते.


◆ कंपनीचे विभाजन

1872 पर्यंत रॉकफेलरनी जवळपास इतर सर्व प्रतिस्पर्धी कंपन्या बाजारातून संपवल्या होत्या. कंपनीची मक्तेदारी संपवण्यासाठी अमेरिकन सरकारने अँटी- ट्रस्ट कायदा करून स्टँडर्ड ऑइल कंपनीचे तब्बल 38 तुकडे पाडले, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे एक्सॉन, मोबिल, शेव्हरॉन, अमोको हे स्टँडर्ड ऑइलमधील 'तुकडे' आजही कोट्यावधी डॉलर्सची उलाढाल करत आहेत.


◆ निधन

जॉन यांचे फ्लोरिडा राज्यातील ऑर्मंड बीच येथे 23 मे 1937 रोजी वयाच्या 97व्या वर्षी निधन झाले. शून्यातून सुरुवात करून इतकी महाप्रचंड संपत्ती कमावणारे रॉकफेलर जगातील एकमेव व्यक्ती आहेत.


प्रत्येक संकटाचं संधीत रूपांतर करण्याचा प्रयत्न करा - जॉन डेव्हिसन रॉकफेलर