adsense

नारायण मूर्ती यांची माहिती : Narayan Murti Biography in Marathi

 नारायण मूर्ती

Narayan murti marathi
Narayan Murti information in marathi


आजच्या लेखात भारतीय आयटी उद्योगाचे पितामह, भारतीय उद्योजक आणि इन्फोसिस या जगप्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनीचे संस्थापक असणारे नारायण मूर्ती यांच्या जीवन प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत.


◆ जन्म

नारायण मूर्ती यांचा जन्म २० ऑगस्ट १९४६ रोजी कर्नाटकच्या सिडलाघट्टा येथे झाला. नारायण मूर्ती सुरुवातीपासूनच हुशार होते आणि इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत लवकर प्रश्नपत्रिका सोडवत असत.


◆ शिक्षण

त्यांनी १९६७ मध्ये म्हैसूर विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि नंतर कानपूरच्या आयआयटीमधून एम.टेक. १९६९ मध्ये पूर्ण केले.


मूर्तीनी करिअरची सुरुवात आयआयएम अहमदाबाद येथून चीफ सिस्टम्स प्रोग्रामर म्हणून करिअरची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी सॉफ्ट्रॉनिक्स नावाची कंपनी स्थापन केली जी यशस्वी होऊ शकली नाही. त्यानंतर त्यांनी पटनी कॉम्प्यूटर सिस्टीम्स पुणे येथे नोकरी केली. येथे त्यांची नंदन निलेकणी आणि इतरांशी भेट झाली.


◆ इन्फोसिसची स्थापना

१९८१ मध्ये त्यांनी सहा सहकाऱ्यांबरोबर पुण्यात इन्फोसिस कंपनीची स्थापना केली. यासाठी लागणारे १० हजार रुपये भांडवल त्यांची पत्नी सुधा मूर्तीनी दिले. त्यांच्या पत्नी श्रीमती सुधा मूर्ती या प्रख्यात लेखिका आहेत. १९८१ ते २००२ या काळात मूर्ती इन्फोसिसचे सीईओ होते. २०११ साली त्यांनी निवृत्ती घेतली.


मूर्ती HSBC बँकेच्या संचालक मंडळावर आहेत. तसेच DBS बँक, युनिलिव्हर, आयसीआयसीआय आणि एनडीटीव्हीमध्ये सुद्धा ते संचालक होते. तसेच ते कॉर्नेल विद्यापीठ, INSEAD विद्यापीठ, ESSEC बिझनेस स्कुल, फोर्ड फाऊंडेशन आणि यूएन फाउंडेशनच्या सल्लागार मंडळावर आहेत.


आज इन्फोसिस ही भारतातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी आहे. तर कंपनीत २ लाख ६० हजार जण काम करतात. अमेरिकन शेअर बाजार नॅसडॅक वर नोंदवली जाणारी इन्फोसिस पहिली भारतीय कंपनी आहे.


फॉर्म्युन मासिकाच्या १२ महान उद्योजकांमध्ये त्यांचं नाव होतं. भारतीय आयटी उद्योगाचे पितामह म्हणून मूर्तीना ओळखलं जातं. त्यांची 'ए बेटर इंडिया, अ बेटर वर्ल्ड', क्लिअर ब्लू स्काय ही पुस्तक प्रसिद्ध आहेत.


◆ पुरस्कार

मूर्तीना पद्मश्री, पद्मविभूषण, फ्रान्सचा सर्वोच्च 'ऑफिसर ऑफ द लीजन ऑफ ऑनर', इंग्लंडचा 'कमांडर ऑफ द आर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर' हे पुरस्कार, अर्स्ट अँड यंगचा आंत्रप्रिन्युअर ऑफ द इयर' हा अॅवॉर्ड मिळविणारे ते पहिले भारतीय आहेत.