adsense

उद्योजक भाविश अग्रवाल : Bhavish Aggarwal Biography in Marathi

 भाविश अग्रवाल

भाविश अग्रवाल हे भारतातील सर्वात मोठी कॅब सर्व्हिस ओला कंपनीचे संस्थापक आहेत. 2018 च्या टाइम पत्रिकेत 100 प्रभावी व्यक्तीमध्ये त्यांना सहभागी केले होते. आज भाविश अग्रवाल यांचा ola cab ते ola electric scooter पर्यंतचा प्रवास जाणून घेणार आहोत ...!


Ola scooter
Bhavesh aggarwal information in marathi


◆ सुरुवातीचे जीवन व बालपण


भाविशचा जन्म २८ ऑगस्ट १९८५ ला पंजाबमधील लुधियाना शहरात झाला. भाविश अग्रवाल यांनी आपले शालेय शिक्षण लुधियाना,पंजाब मधील सेक्रेड हार्ट कॉन्वेंट स्कूल मधून पूर्ण केले. भाविश अग्रवाल यांचे आई वडील डॉक्टर आहेत, वडील एक आर्थोपेडिक सर्जन आहेत तर त्यांची आई एक पैथोलॉजिस्ट आहे.


◆ मायक्रोसॉफ्टमध्ये नोकरी


त्याने आयआयटी मुंबई मधून कॉम्पुटर सायन्समध्ये इंजिनिअरिंग पूर्ण केले. त्यानंतर रिसर्च इंटर्न म्हणून मायक्रोसॉफ्टमध्ये २ वर्ष नोकरी केली.


एकदा बंगळूर ते बांदीपूर असा प्रवास करत असताना त्याने एक कार बुक केली. प्रवास सुरू असताना कारचालकाने मध्येच गाडी थांबवून भाविशकडे जादा पैशांची मागणी केली. त्याला नकार दिल्यावर चालकाने सरळ सरळ प्रवास थांबवायची धमकी दिली.


शाब्दिक चकमकीनंतर भाविश गाडीतून उतरला आणि उर्वरित प्रवास त्याला बसने करावा लागला. यामुळे वैतागलेल्या भाविशच्या मनात विचार आला की प्रवासाकरता आपल्याकडे एखादी पद्धतशीर व्यवस्था का नसावी? अनेकांना हा त्रास सहन करावा लागत असेल. आपल्याला याबाबत काही करता येईल का? या प्रश्नाचं उत्तर म्हणून जन्माला आली 'ओला कॅब सर्व्हिस.'


◆ Ola Cab ची सुरुवात


ऑगस्ट २०१० मध्ये भाविशने आपल्या मायक्रोसॉफ्टमधल्या नोकरीला रामराम ठोकला. नोव्हेंबरमध्ये अंकित भाटी या मित्रासोबत टॅक्सी विश्वातलं एक नवं पर्व सुरू झालं.


नोकरी सोडायचं जेव्हा घरी सांगितलं, तेव्हा 'इतकी चांगली नोकरी सोडून काय ट्रॅव्हल एजंट होणार का?" असा प्रश्न घरच्यांना पडला. घरातून होणारा प्रचंड विरोध झुगारून भाविशने काम सुरूच ठेवले. आज भारतातील सर्वात श्रीमंत तरुण उद्योजकांपैकी तो एक आहे.


आज 'ओला'कडे १५ लाख चालक असून त्यांच्या माध्यमातून दरवर्षी १०० कोटींहून अधिक फेऱ्या केल्या जातात. भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलँड, इंग्लंडमधील २५० हून अधिक शहरांत ओला आपली सेवा पुरवते. कंपनीत ७००० हून अधिक कर्मचारी आहेत.


◆ ओला इलेक्टिक स्कुटर


ओला तामिळनाडूमध्ये इलेक्ट्रिक स्कुटर फॅक्टरी बनवत असून कंपनीकडून २४०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. यामुळे १० हजार नव्या नोकऱ्या निर्माण होणार आहेत. एकूण ५०० एकरमध्ये तयार होणारी ही फॅक्टरी जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक स्कूटर बनवणारी फॅक्टरी असेल.


पहिल्या टप्प्यात प्रतिवर्षी २० लाख स्कूटर बनवल्या जातील. पूर्णपणे कार्यरत झाल्यावर दरवर्षी १ कोटी स्कूटर तयार होतील. म्हणजेच साधारण प्रत्येक दोन-तीन सेकंदात एक इलेक्ट्रिक स्कूटर फॅक्टरीतून बाहेर पडेल.


भावेश अग्रवाल म्हणतात आयडिया ह्या सर्वांजवळ असतात पण त्या सत्यात उतरवण्यालाच यश मिळते...!