adsense

रितेश अग्रवाल माहिती : Ritesh Agarwal Biography in Marathi

रितेश अग्रवाल  

           व्यवसाय करणे प्रत्येकालाच जमते असे नसते. व्यवसाय करण्यासाठी व्यवसाय ज्ञान असणे खूप महत्वाचे आहे. कठोर परिश्रम, निष्ठा आणि संपूर्ण समर्पण यांनी केलेला व्यवसाय यशस्वी होतो. व्यवसायात यश मिळविण्यासाठी सामान्य माणसाला विपणन अनुभवाची आवश्यकता असते, त्यामध्ये सर्व प्रकारच्या समस्या सोडविण्याची क्षमता असणे आवश्यक आहे आणि या सर्व गोष्टी साध्य करण्यासाठी एखाद्या व्यक्तीचे अर्ध आयुष्य निघून जाते, मग तो एक यशस्वी व्यक्ती बनतो.

परंतु ही विचारसरणी खोटी असल्याचे सिद्ध करीत ओयो रूम्स OYO rooms ऑफ इंडियाचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रितेश अग्रवाल Ritesh Agarwal यांनी वयाच्या 21 व्या वर्षी व्यवसायात मोठे यश मिळवले आहे. एवढ्या कमी वयात ?? आज या लेखात रितेश अग्रवाल या यशस्वी व्यावसायिकाच्यामागील खरी कथा जाणून घेऊया.

रितेश अग्रवाल हे ओयो रूम्सचे मालक व संस्थापक आहेत. ओयो रूम्सचा मुख्य उद्देश कमी किमतीमध्ये देशातील मोठ्या हॉटेल्समध्ये रूम उपलब्ध करून देणे हा आहे. 2013 मध्ये वयाचा 20 व्या वर्षी त्यांनी ओयो रूम्स ॲपची सुरुवात केली.

Ritesh agarwal marathi
Ritesh agarwal information in marathi


◆ सुरुवातीचे जीवन

रितेश अग्रवाल यांचा जन्म 16 नोव्हेंबर 1993 मध्ये ओरिसा राज्यातील कटक या ठिकाणी झाला. तेथेच प्राथमिक शिक्षण घेतल्यावर ते अधिक शिक्षणासाठी राजस्थान मधील कोटा येथे गेले. त्याच्या कुटुंबात आई, वडील आणि तीन भाऊ आहेत. त्याचे वडील इन्फ्रास्ट्रक्चर कॉर्पोरेशनमध्ये काम करतात आणि आई गृहिणी आहेत. रितेश यांना नवनवीन ठिकाणी फिरण्याचा छंद होता. त्यामुळे ते खूप ठिकाणी फिरले. जेव्हा ते प्रवासासाठी जात असत तेव्हा त्यांना राहण्यासाठी रूम मिळत नसत, किंवा जास्त पैसे देऊन सुद्धा चांगली रूम मिळत नव्हती. तर कधी कधी कमी पैसे देऊन चांगली रूम मिळत असे. ह्या सगळ्या अनुभवांमधून प्रेरणा घेऊन त्यांनी ठरवले की ऑनलाईन रूम बुक करण्याची एक वेबसाईट सुरू करायची, की ज्यामुळे प्रवाशांना चांगल्या सोयी सुविधा मिळतील.


◆ ओयो रूम्सची सुरुवात

2012 मध्ये त्यांनी आपल्या ओरॅव्हल स्टेज़ (Oravel Stays) नावाच्या कंपनीची सुरुवात केली. काहीच महिन्याने नवीन चालू झालेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या व्हेंचर नर्सरी या कंपनीकडून त्यांना ३० लाखांचा फंड मिळाला. खूप कमी वेळामध्ये त्यांचा कंपनीला जे यश मिळाले त्यामुळे ते खूप उत्साहित झाले व ते अजून उत्साहाने व बारकाईने काम करू लागले. पण त्यांचा ह्या कंपनीचे मॉडेल अयशस्वी ठरले व त्यांची कंपनी तोट्यात गेली. त्यांनी कंपनीची परिस्थिती सुधरवण्याचा खूप प्रयत्न केला पण ती सुधारू शकली नाही व त्यांनी ओरॅव्हल स्टेज़ कंपनी तात्पुरती बंद केली.


◆ नव्याने सुरुवात

रितेश अग्रवाल यांची कंपनी जरी बंद झाली असली तरी त्यांनी हार मानली नव्हती, त्यांनी पुन्हा नव्याने सुरुवात करण्याचे ठरवले. त्यांना प्रवास करताना ज्या अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यावर त्यांनी विचार केला. 2013 साली त्यांनी नवीन कंपनीची सुरुवात केली. तीचे नाव त्यांनी ओयो रूम्स असे ठेवले. ओयो रूम्सचा अर्थ असा होतो कि, तुमची स्वतःची रूम. ओयो रूम्स चा उद्धेश फक्त लोकांना रूम उपलब्ध करून देणे इतकाच नव्हता, तर लोकांना कमी किमतीमध्ये चांगल्या रूम्स उपलब्ध करून देणे हा होता. त्यांची कंपनी हॉटेल्स मध्ये जाऊन रूमची पडताळणी करते. रूमची पडताळणी करून मग जर ते हॉटेल पसंद पडले तरच ते ओयो शी जोडले जात असे.

आता 15000 पेक्षा जास्त हॉटेल्स ओयो रूम्स मध्ये समाविष्ट आहेत. 2016 मध्ये जपानच्या एका कंपनीने रितेश अग्रवाल यांचा कंपनी मध्ये अब्जावधी रुपयांची गुंतवणूक केली. 2016 मधेच एका प्रतिष्ठित मॅगाझीन ने रितेश अग्रवाल यांना भारतीय प्रभावशाली युवकांच्या यादीमध्ये पहिल्या 50 लोकांचा यादी मध्ये स्थान दिले होते.

आज ओयो  रूम्सचे नाव भारतातील सर्वात मोठ्या बजेटच्या ब्रांडेड हॉटेल चेन म्हणून प्रसिद्ध झाले आहे आणि हे सर्व रितेश अग्रवाल यांच्या मेहनतीचे फळ आहे. वयाच्या 21 व्या वर्षी भारताचा अव्वल उद्योगपती बनणे हे स्वतःच एक उदाहरण आहे, जे कोट्यावधी लोकांना रितेशकडून शिकण्यास प्रेरित करेल.