adsense

नागराज मंजुळे यांची माहिती : Nagraj Manjule Biography in Marathi

 नागराज मंजुळे 

Nagraj Manjule Mahiti

मराठी चित्रपटसृष्टीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या ‘सैराट’ चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे कसे घडले? असा औत्सुक्याचा प्रश्न अनेक चाहत्यांच्या मनात आहे. नागराज मंजुळे म्हणतात, ‘चित्रपट’ हे माध्यम लहानपणापासून खूप जवळचे होते. चित्रपट हा समाजमनाचा आरसा आहे, असंही म्हटले जाते. पण माझ्या जीवनाचे प्रतिबिंब मला त्यात कधी दिसलेच नाही, म्हणून याच माध्यमातून मी माझी गोष्ट सांगण्याचा, मनातल्या गोष्टी उपसायचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे. प्रेक्षकांनाही या गोष्टी आवडत आहेत याचा मला आनंद आहे. ते दिग्दर्शक, अभिनेता, कवी, निर्माते तसेच पटकथालेखक सुद्धा आहेत. त्यांचा 'उन्हाच्या कटाविरूद्ध' हा कवितासंग्रहही प्रकाशित आहे.


◆ सुरुवातीचे जीवन: Nagraj Manjule Information

नागराज पोपटराव मंजुळे यांचा जन्म 24 ऑगस्ट 1977 रोजी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील जेऊर एका छोट्याश्या गावी झाला. त्यांचे आई वडील हे वडार समाजातील असल्याने घरची परिस्थिती अत्यंत बिकट होती. लहानपणापासूनच नागराज यांना चित्रपट पहायला आवडायचे. सुरुवातीला नागराजला अभ्यासाचा कंटाळा येत असे. शाळा महाविद्यालयात असताना त्यांची हजेरी शाळेत कमी व गावातल्या व्हिडीओ सेंटरलाच जास्त असायची. त्याठिकाणी त्यांनी खूप चित्रपट पाहिले. 17 मे 1997  मध्ये नागराज यांचे सुनीता यांच्याशी लग्न झाले तेव्हा ते फक्त 19 वर्षांचे होते व बारावीत शिकत होते. लग्नाच्या 15 वर्षानंतर 2012 मध्ये त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आणि 2014 मध्ये त्यांचे घटस्फोट झाले.


◆ शिक्षण: Nagraj Manjule Education

वडार समाजात शिक्षणाचे प्रमाण अत्यंत कमी, तरीही नागराज यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण जेऊर येथे झाले. पुढील शिक्षणासाठी ते पुणे विद्यापीठात शिकायला आले. नागराज मंजुळे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपले प्रेरणास्थान मानतात. मराठी विषयात एम.ए. आणि पुढे एम.फिल केले. अहमदनगरच्या महाविद्यालयात मास कम्युनिकेशनचा दोन वर्षाचा कोर्स पूर्ण केला. आणि तिथेच प्रोजेक्टचा एक भाग म्हणून 'पिस्तुल्या' ही पहिला लघुपट निर्माण केला.


त्यांच्या पिस्तुल्या या 18 मिनिटाच्या लघुपटने 2010 मध्ये राष्ट्रीय पुरस्कारासह अनेक पुरस्कारही जिंकले. हा लघुपट एका मागास जातीच्या मुलाभोवती फिरत आहे ज्याला शाळेत जाण्याची इच्छा आहे, परंतु कुटुंबाच्या गरीबीमुळे व समाजात शिक्षणास महत्त्व नसल्यामुळे त्याला शाळेत जात येत नाही. त्यातील बालकलाकार सुरज पवार यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.


◆ चित्रपटसृष्टीतील कारकीर्द

चित्रपटांमधील अभिनेत्री या नेहमीच गोऱ्या, नाजूक, सुंदर, वेंधळ्या, घाबरट दाखवलेल्या असतात. पण नागराज यांची आजूबाजूची परिस्थिती मात्र वेगळी होती. त्यांना चित्रपटातील हे पारंपरिक ‘स्टेरिओटाईप’ खटकायचे, त्यांचा राग यायचा. त्यांच्या आजूबाजूला अनेक सक्षम, कर्तृत्ववान, नीतीमूल्य जपणाऱ्या स्त्रिया ते पाहत. त्यामुळे त्यांच्या आजूबाजूची परिस्थिती त्यांनी चित्रपटांमधून  दाखवायचा प्रयत्न केला. लहानपणापासून गोष्ट ऐकायची व सांगायची अशी त्यांची आवड होती या क्षेत्रातही त्यांनी तीच आवड स्वीकारली आहे. परिणामांची चिंता न करता त्यांनी या गोष्टी माध्यमातून लोकांसमोर मांडले आहे.


त्यांचा प्रथम चित्रपट फॅंड्री फेब्रुवारी 2014 मध्ये प्रदर्शित झाला. फॅंड्री म्हणजे कैकाडी भाषेतील डुक्कर. चित्रपटाला जबरदस्त समीक्षणा मिळाली पण चित्रपटगृहांमध्ये प्रभाव पाडण्यात चित्रपट अयशस्वी झाला. 


त्यांचा दुसरा चित्रपट 'सैराट' सर्वाधिक कमाईचा चित्रपट ठरला. 2016 मध्ये प्रसिध्द झालेला सैराट हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत 100 कोटीच्या वर कमाई करणारा पहिला ब्लॉकबस्टर चित्रपट होता. सैराट हा हिट ठरला. नागराज मंजुळे दिग्दर्शित या चित्रपटाने रसिकांना जणू काही याड लावलं. या चित्रपटात ऑनर किलिंग आणि जातीभेद यांचे चित्रण वर्णन केले आहे. सैराट या चित्रपटाच्या टीमबरोबर त्यांनी द कपिल शर्मा शोच्या मालिकेमध्ये भाग घेतला. या चित्रपटाने महाराष्ट्राला आर्चि व परश्या सारखे नवे चेहरे दिले.


2018 मध्ये नाळ या चित्रपटासोबत त्यांनी निर्माता म्हणून पदार्पण केले. 2018 मध्ये अमिताभ बच्चन अभिनीत ‘झुंड’ हा पहिला हिंदी चित्रपट दिग्दर्शित करण्यास सुरुवात केली. हा चित्रपट स्लम सॉकरचे संस्थापक विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात बच्चन एका प्राध्यापकाच्या भेमुकेत आहे जो रस्त्यावरच्या मुलांना एकत्रित करून फुटबॉल संघ बनवतो. चित्रीकरण डिसेंबर 2018 मध्ये नागपूर येथे सुरू झाले. हा चित्रपट 18 जून 2021 रोजी रिलीज होणार आहे. 

Nagraj Manjule with Amitabh Bacchan