adsense

अजय-अतुल यांचा जीवनप्रवास - Ajay-Atul biography in marathi

अजय-अतुल

    
      अजय-अतुल ही भारतीय संगीतातील लोकप्रिय संगीतकार जोडी. यांनी मराठी सिनेसृष्टीला आपल्या संगीतांनी सोनेरी दिवस आणले. त्यांनी भारतीय संगीतक्षेत्रात हिंदी, मराठी तसेच तेलुगू सारख्या विविध भाषांमधील चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन केले आहे.  अजय-अतुल हे संगीत दिग्दर्शानासोबत संगीत संयोजन, पार्श्वसंगीत व पार्श्वगायन देखील करतात. "विश्वविनायक" या गीतसंग्रहाद्वारे संगीतक्षेत्रात पदार्पण करून या जोडीने सावरखेड एक गाव, अगं बाई अरेच्या!, जत्रा, जबरदस्त, चेकमेट, साडे माडे तीन, उलाढाल, एक डाव धोबीपछाड, जोगवा ,नटरंग, लै भारी, फैन्ड्री आणि सैराट सारखे मराठी चित्रपटात संगीत दिले. 

         तसेच त्यांनी गायब, सिंघम, पीके, अग्निपथ, ब्रदर्स सारखे हिंदी व शॉक सारख्या तेलुगू चित्रपटांना संगीतबद्ध केले आहे. 2008 मध्ये, जोगवा या मराठी चित्रपटाला उत्कृष्ठ संगीत दिल्याबद्दल अजय-अतुल यांना भारत सरकारच्या 56 व्या राष्ट्रीय चित्रपट संगीत दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला. ‘सैराट’ या मराठी चित्रपटासाठी हॉलिवूडमधील सोनी स्कोरिंग स्टुडिओमध्ये संगीत रेकॉर्ड करणारे ते पहिले भारतीय संगीत दिग्दर्शक ठरले. 

Ajay-Atul biography in marathi
Ajay Atul Mahiti


◆ सुरुवातीचे जीवन


      अतुल अशोक गोगावले (11 सप्टेंबर 1974) आणि अजय अशोक गोगावले (21 ऑगस्ट 1976) यांचा जन्म  पुण्यातील आळंदी येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला.  अजय अतुलचा छोटा भाऊ आहे. त्यांचे वडील अशोक गोगावले हे महसूल विभाग अधिकारी असल्याने, वडलांची गावोगावी बदली होत असे. त्यांचे प्राथमिक शिक्षण शिरूर, राजगुरुनगर, पुणे येथे झाले. लहानपणापासून शिक्षणात रस नसले तरी त्यांनी संगीताची खूप आवड होती. दहावीच्या प्राथमिक परीक्षेत अतुलने गणिताच्या पेपरात चित्रे काढली होती. शाळेत असताना त्यांना कवितांना चाली लावण्याचा छंद होता.  सांगीतिक वारसा नसला तरी घरात संगीतमय वातावरण असे. 

      त्यांच्या कुटुंबीयांचा त्यांना विरोध नव्हता परंतु त्यांना त्यांच्या संगीत साधने परवडत नव्हती. ते शाळा, मंदिरे, स्थानिक बॅन्ड पथकांसोबत फिरून सांगीतिक भूक भागवत. त्यांना कोणतेही संगीत प्रशिक्षण नव्हते परंतु त्यांनी या उपक्रमांमधून बरेच काही शिकले. त्यांना संगीत साधने परवडत नसल्याने हार्मोनियम, मृदंगम, ढोल इत्यादी उपकरणांची मालकी असलेल्या लोकांशी ते मैत्री करतीत. त्यांच्या आईच्या आग्रहावर त्यांच्या वडिलांनी त्यांना एक कीबोर्ड विकत घेतला. ही त्यांची सर्वात मोठी भेट ठरली. त्यांचे वडील म्हणाले, "तुम्हाला बालपणात खेळणी घेऊन दिली नाही, म्हणून आता हे तुमच्या खेळण्यासारखे आहे." यामुळे त्यांना प्रेरणा मिळाली आणि त्यांनी प्रयोग करण्यात सुरुवात केली. 

       शिवसेना प्रमुख बाळ ठाकरे व दादा कोंडके उपस्थित असलेल्या एका कार्यक्रमात त्यांनी गायलेल्या पोवाड्याचे शाल, श्रीफळ वा हार देऊन कौतुक केले गेले होते, त्यांनी ते हार काही दिवस पाणी शिंपडून जतन करून ठेवले होते. NCC च्या एका कार्यक्रमात शिकवलेली धुन न वाजवता त्यांनी त्यांचीच एक धुन वाजवून पुरस्कार पटकावला. सांगीतिक जडण घडणीची ही सुरूवात होती. शिक्षणानंतर त्यांनी मुंबई गाठली आणि त्यांनी ‘विश्वविनायक’ या आंतरराष्ट्रीय नॉन-फिल्मी संगीत अल्बमवर काम करण्यास सुरवात केली. तेथूनच त्यांचे संगीत क्षेत्रात आगमन झाले.


◆ संगीत शिक्षण


     अजय-अतुल यांना शास्त्रशुद्ध संगीताचे शिक्षण घेता आले नाही. पण काळानुसार व संगीताच्या प्रदीर्घ आवडीमुळे त्यांनी संगीतात प्रयोग करणे सुरू ठेवले व तेच रसिकांना आवडू लागले. ते इलयाराजा यांना आपले गुरुस्थानी मानतात.

Ajay-Atul biography in marathi
Ajay Atul Information in Marathi


◆ कारकीर्द


     मन उधाण वाऱ्याचे, मल्हारवारी, कोंबडी पलाली या त्यांच्या उल्लेखनीय रचना आहेत. अजय-अतुल यांनी 'नटरंग' (2010) या मराठी चित्रपटाची गाणी आणि पार्श्वसंगीत केले. लावणी, फटका आणि तमाशा अशा पारंपारिक मराठी लोकसंगीत नटरंग मध्ये त्यांनी केले. त्यांनी रोहित शेट्टी दिग्दर्शित अजय देवगन अभिनीत सिंघम आणि बोल बच्चन या हिंदी चित्रपटांसाठी संगीत दिले होते. करण जोहर निर्मित व करण मल्होत्रा ​​दिग्दर्शित अग्निपथ, ब्रदर्स यांनाही संगीत दिले. आमिर खानच्या Pk या चित्रपटालाही त्यांनी संगीताचे योगदान दिले. 

        2016 मध्ये त्यांनी नागराज मंजुळे यांच्या सैराट चित्रपटात काम केले जो 110 करोडपेक्षा जास्त कमाई करणारा एकमेव मराठी चित्रपट ठरला. एस. नारायण दिग्दर्शित सैराटच्या मनसु मल्लिगे कन्नड रीमेकमध्येही काम केले आहे. त्यांनी गिरीश कुलकर्णी दिग्दर्शित ‘जाऊ द्याना बाळासाहेब’ या मराठी चित्रपटाची निर्मिती केली.

        2018 त्यांच्यासाठी सुपरहिट वर्ष बनले. त्यांनी धडक, तुंबड, ठग्स ऑफ हिंदुस्तान, माऊली, झिरो या चित्रपटांसाठी काम केले. माऊली मध्ये त्यांनी माऊली माऊली हे गाणे लई भारीचे पुन्हा तयार केले. झिरो मध्ये मेरा नाम तू मधील त्यांच्या पहिल्या गाण्याने यूट्यूबवर 24 तासात 18 दशलक्ष दृश्य Views प्राप्त केले. पण हा गाणी हिट होऊन सुध्दा आणि शाहरुख खानने उत्तम अभिनय करूनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाला.

◆ हिट गाणी


     झिंगाट, चिकनी चमेली, अभि मुझे में कहिन, जीव रंगला, वाजले की बारा, अप्सरा आली, कोंबडी पलाली, मल्हार वारी, मोरया, लल्लती भंडार, माउली, ब्रिन्ग इट ऑन, मेरा नाम मेरी है आणि डॉल्बी इत्यादी. त्यांच्या काही गाण्यांपैकी लोकप्रिय गाणी आहेत.

 
    अजय-अतुल यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास आवडल्यास नक्की शेयर कर...
   ✒️ आपल्या भाषेत मराठी भाषेत 🇮🇳