adsense

Rinku Rajguru Biography in Marathi- आर्ची : रिंकू राजगुरू

प्रेरणा महादेव राजगुरू 

                रिंकू राजगुरू ही एक भारतीय अभिनेत्री आहे, ज्याने २०१६ मध्ये रिलीज झालेल्या ब्लॉकबस्टर मराठी चित्रपटाद्वारे पदार्पण केले होते. हा चित्रपट मराठी सिनेमाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आणि चित्रपटातील विशेष उल्लेखनीय कामगिरीमुले रिंकुला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

Rinu Rajguru Biography in Marathi-
Rinku Rajguru mahiti

◆ जीवन : Rinku Rajguru Information 

     प्रेरणा महादेव राजगुरु एक मराठी चित्रपट अभिनेत्री आहे. ही अभिनेत्री तिच्या रिंकू ह्या टोपण नावाने प्रसिद्ध आहे. रिंकूचा जन्म ३ जून २००१ रोजी महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील अकलूज शहरात झाला. रिंकूला नृत्याची आवड आहे आणि नियमितपणे या कलेचा अभ्यास करते. तिला गाणे व नृत्य करण्याची आवड असली तरीही, रिंकूला डॉक्टर बनण्याची आकांक्षा आहे.

◆ अभिनय करिअर

        रिंकु ही सैराट या चित्रपटामधील नायिका ‘आर्ची’ (अर्चना पाटील) या भूमिकेसाठी ओळखली जाते.
तिने आपल्या अभिनयाची सुरुवात आकाश ठोसर या नटासोबत केली. ती सध्या जिजामाता कन्या प्रशाला या (अकलुज : जिल्हा सोलापूर) शाळेमध्ये  शिकत आहे. साखर कारखान्याच्या श्रीमंत मालकाच्या घरी जन्मलेल्या परंतु धाडसी आणि निश्चयी अशा अर्चना पाटील उर्फ आर्चीची धडाकेबाज भूमिका अत्यंत नैसर्गिक अभिनयाने नटविल्याकारणाने सर्वत्र रिंकूचे कौतुक होत आहे. जीवनात प्रथमच सिनेमाच्या कॅमेऱ्यासमोर उभे राहून इतका सुंदर अभिनय तिने कसा केला असेल ह्याबद्दल तिचे सर्वच चाहते आश्चर्य व्यक्त करीत आहेत.  

      तिला अभिनयाची जन्मजातच देणगी असल्याचे या सिनेमातील तिच्या ज्वलंत अभिनयामुळे दिसून येत आहे. तिला २०१५ मध्ये ६३ व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात स्पेशल ज्युरी पुरस्कार / विशेष उल्लेख पुरस्काराने (चित्रपट) गौरवण्यात आले.तिच्या अभिनयाने प्रभावित झालेल्या कन्नड दिग्दर्शक श्री एस्. नारायण ह्यांनी सैराटच्या कन्नड रिमेककरिता रिंकूला नायिका म्हणून घेतले आणि हा सिनेमा (सिनेमाचे नाव: मनसु मल्लिगे, अर्थ: मन हा मोगरा) ३१ मार्च २०१७ रोजी चित्रपटगृहांमध्ये झळकला.

◆ चित्रपट 

२०१६ सैराट ( मराठी )
२०१७ मान्सु मिलानगय ( कन्नड )
२०१९ कागर ( मराठी )
२०२० मेकअप ( मराठी )
२०२० झुंड ( हिंदी )

     «« आपल्या भाषेत मराठी भाषेत »»